शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलीस आयुक्त पोहोचले मजुरांच्या कॅम्पमध्ये : व्यवस्थेचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:14 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली.

ठळक मुद्देमजुरांशीही साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था कशी आहे, त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू सोबत दिल्या की नाही, ते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज पांजरी टोलनाक्यावरच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहणी केली. येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येथील मजुरांशी संवाद साधला आणि त्यांची व्यथाही समजून घेतली.नागपुरात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सेवाभावी संस्था, संघटना आणि नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शहराला जोडणाऱ्या वेगवेगळ्या सात ठिकाणी व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था कशी आहे, मजुरांना बाहेरगावी पाठविताना त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहे की नाही, ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आज दुपारी १२ च्या सुमारास पांजरी टोल नाक्यावर उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये पोहोचले. येथे त्यांनी कोणत्या वाहनातून, कोणत्या गावाला पाठविण्यात येत आहे, त्यासाठी कशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मजुरांशी संवाद साधला. त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत मिळाल्या की नाही, त्याबाबत विचारणा केली. त्याचप्रमाणे त्यांना धीर देऊन सुखरूप परत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मध्ये काही अडचणी आल्यास नागपूरपोलिसांशी संपर्क करण्याचीही सूचना केली. मजुरांनी डॉ. उपाध्याय यांना धन्यवाद दिले. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमुळे नागपुरात अडकून पडलेल्या हजारो परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची व्यवस्था २६ शेल्टर होममध्ये करण्यात आली होती. तेथे त्यांना जेवण तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविल्या जात होत्या. शिवाय त्यांच्या मनोरंजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जात होते. सरकारकडून त्यांना त्यांच्या गावात पाठविण्याची सूचना मिळताच पोलिसांनी या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सुमारे ५० बसेसची व्यवस्था विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून केली आहे. आजपावेतो ९ ते १० हजार मजूर आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचविण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे, हे कार्य नियमित सुरू आहे.अजूनही अनेक ठिकाणचे मजूरमहाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मजुरांसह, यूपी, एमपी, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि बिहारसह अनेक राज्यांतील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. मात्र, अजूनही असे शेकडो मजूर नागपुरात आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी एकूण सात ठिकाणी त्यासाठी तात्पुरते कॅम्प उभारले आहेत. याच ठिकाणी मजुरांची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात येत आहे.

टॅग्स :commissionerआयुक्तPoliceपोलिसnagpurनागपूर