शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

नागपुरात कुऱ्हाड आणि सुऱ्याच्या धाकावर पेट्रोलपंपाचा गल्ला लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 19:47 IST

Nagpur News घातक शस्त्राचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण करत तीन दरोेडेखोरांनी पेट्रोल पंपावरची सव्वादोन लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी मध्यरात्री वर्धा मार्गावरच्या आशिष ऑटोमोबाईल्स नामक पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

ठळक मुद्देसोनेगाव पोलीस ठाण्याजवळची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - घातक शस्त्राचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण करत तीन दरोेडेखोरांनी पेट्रोल पंपावरची सव्वादोन लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी मध्यरात्री वर्धा मार्गावरच्या आशिष ऑटोमोबाईल्स नामक पेट्रोल पंपावर ही घटना घडली. (In Nagpur, a petrol pump was looted at gunpoint)सोमलवाडा चौकाजवळ सोनेगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर उज्ज्वलनगरात हा पेट्रोलपंप आहे. गांधीनगरातील रोहन राठोड यांच्या मालकीच्या या पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री १०.३० पर्यंत कर्मचाऱ्यांनी व्यवहार केला. त्यानंतर पंप बंद करून दोन कर्मचारी घरी निघून गेले तर ब्रम्हानंद शुक्ला आणि आशिषप्रसाद कौशलप्रसाद पांडे हे दोन कर्मचारी दिवसभराचा हिशेब करू लागले. २ लाख, ३० हजार रुपयांची रोकड पंपाच्या कॅबिनमधील ड्रॉवरमध्ये ठेवल्यानंतर शुक्ला आणि पांडेने जेवण केले. रात्री १२.३० च्या सुमारास ते झोपण्याच्या तयारीत असताना हातात कुऱ्हाड आणि सुरा घेऊन तीन आरोपी कॅबिनमध्ये शिरले. त्यांनी शुक्ला आणि पांडेला मारहाण करून जीवे मारण्याचा धाक दाखवला तसेच ड्रॉवरमधील २ लाख, ३० हजारांची रोकड घेऊन आरोपी पळून गेले.शुक्ला आणि पांडेने या घटनेची माहिती आधी पंपमालक राठोड यांना कळविली. राठोड यांनी सोनेगाव पोलिसांना सांगितले. त्यानंतर सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर आपल्या ताफ्यासह पंपावर पोहचले. गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक, ठसे तज्ज्ञही पोहचले.पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी पंपावरील तसेच आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. माहिती कळताच परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनीही पेट्रोल पंप तसेच सोनेगाव ठाण्यात धाव घेतली. पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना शोधून काढण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके कामी लावण्यात आली. मात्र, २० तासानंतरही आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते.सराईत गुन्हेगाराचे कृत्य२४ तास वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा मार्गावर ही लुटमार घडवून आणणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आहे. त्यांनी आपली कार रस्त्याच्या (दुभाजकाच्या) पलिकडे हॉटेल सेंटर पॉइंटजवळ उभी करून ठेवली होती. कारमध्ये आरोपींचे आणखी साथीदार असावे, असाही संशय आहे. घटना घडण्यापूर्वी आपण किंवा आपली कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये, यासाठी आरोपींनी पुरेपुर प्रयत्न केल्याचे एकूण घडामोडीवरून दिसून येते.वर्षभरापुर्वी घडली होती लुटमारीची घटनाया पेट्रोलपंपावर काही महिन्यांपूर्वी लुटमारीची घटना घडली होती. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी पंपावरच्या कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून किरकोळ रक्कम लुटून नेली होती. या घटनेचा आताच्या लुटमारीशी काही संबंध आहे का, त्याचाही तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी