शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

नागपुरात टक्केवारी घटली पण प्रत्यक्ष मतदान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 9:50 PM

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही नागपूरसारख्या मेट्रोपॉलिटीन मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. तर विस्ताराने अफाट व दुर्गम भागाचा समावेश असणाऱ्या रामटेक मतदारसंघात मात्र मतदारांनी आपला जोश हायच ठेवला. नागपुरात ५४.७४ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी मतदान झाले तर रामटेकमध्ये ६२.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ६२.६४ टक्के मतदान झाले होते. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता नागपुरात ९६ हजार ७४२ व रामटेकमध्ये १ लाख ४२ हजार ७२० एवढे अधिकचे मतदान झाले आहे.

ठळक मुद्देनागपुरात २.३८ टक्कयांनी कमी पण ९६ हजार ७४२ मतांची वाढरामटेकमध्ये ०.५२ टक्क्यांची घट तरीही १ लाख ४२ हजार ७२० मतांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही नागपूरसारख्या मेट्रोपॉलिटीन मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. तर विस्ताराने अफाट व दुर्गम भागाचा समावेश असणाऱ्या रामटेक मतदारसंघात मात्र मतदारांनी आपला जोश हायच ठेवला. नागपुरात ५४.७४ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी मतदान झाले तर रामटेकमध्ये ६२.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ६२.६४ टक्के मतदान झाले होते. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता नागपुरात ९६ हजार ७४२ व रामटेकमध्ये १ लाख ४२ हजार ७२० एवढे अधिकचे मतदान झाले आहे.नागपुरात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले यांच्यात ‘हायप्रोफाईल’ लढत होती. या लढतीकडे देशाचे लक्ष होते. त्यामुळे येथे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष ‘बूथ मॅनेजमेंट’ वरून शत प्रतिशत मतदान होण्यासाठी जोरात कामाला लागले होते. निवडणूक विभागही अधिक सतर्क होता. विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासाभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नागपुरातील मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये १९ लाख ७८४ मतदारांपैकी १० लाख ८५ हजार ७६५ मतदारांनी (५७.१२टक्के ) मतदान केले होेते. यावेळी २१ लाख ६० हजार २१७ मतदारांपैकी ११ लाख ८२ हजार ५०७ मतदारांनी (५४.७४ टक्के ) हक्क बजावला. यावरून २.३८ टक्के मतदान कमी झाले असले तरी झालेल्या मतदार संख्येचा विचार करता ९६ हजार ७४२ मतदानाची प्रत्यक्ष भर पडली आहे. नागपुरात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ होता. अनेकांची नावेच गहाळ होती. काहींच्या नावात त्रुटी होत्या. तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. यात ४४ अंशांवर गेलेल्या उन्हानेही घाम फोडला.रामटेकमध्ये मात्र उमेदवारांची फारशी चर्चा नसताना, प्रचाराचा तेवढा जोर नसताना मतदारांचा जोश कायम राहिला. २०१४ मध्ये १६ लाख ७७ हजार २६६ मतदारांपैकी १० लाख ५० हजार ६४० मतदारांनी (६२.६४ टक्के ) हक्क बजावला होता. यावेळी १९ लाख २१ हजार ७४ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी (६२.१२ टक्के) हक्क बजावला. यावरून मतदानात ०.५२ टक्क्यांची किंचिंतशी घट झाली असली तरी प्रत्यक्ष मतदानात १ लाख ४२ हजार ७२० मतांची भर पडली आहे. यावरून ग्रामीण भागातील मतदार हा मतदानाबाबत शहरी मतदारांपेक्षा अधिक जागरूक असल्याचे दिसून आले आहे.

मतदारसंघ                             २०१४                             २०१९                                      घट        प्रत्यक्ष वाढलेले मतदाननागपूर लोकसभा         १०,८५,७६५ (५७.१२ टक्के)    ११,८२, ५०७ (५४.७४ टक्के)    २.३८ टक्के     ९६ ,७४२रामटेक लोकसभा     १०, ५०, ६४० (६२.६४टक्के)    ११, ९३, ३०७ (६२.१२टक्के)         ०.५२           १, ४२, ७२० 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019