शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पवनकर कुटुंब हत्याकांड; क्रूरकर्म्याने करून दाखवले प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 10:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या थरारक हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला घटनास्थळी नेऊन रविवारी पहाटे पोलिसांनी त्याच्याकडून हत्याकांडाचे प्रात्यक्षिक करवून घेतले.१० जूनच्या मध्यरात्रीनंतर नंदनवनच्या आराधनानगरात क्रूर पालटकरने स्वत:च्या मुलासह, सख्ख्या बहिणीचे कुटुंब संपवले. ११ जूनच्या भल्या सकाळी हे पाच जणांचे थरारक हत्याकांड उघडकीस आले. तत्पूर्वीच पालटकर फरार ...

ठळक मुद्देपोलिसांनी तपासला घटनाक्रम पहाटेपर्यंत झाल्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या थरारक हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला घटनास्थळी नेऊन रविवारी पहाटे पोलिसांनी त्याच्याकडून हत्याकांडाचे प्रात्यक्षिक करवून घेतले.१० जूनच्या मध्यरात्रीनंतर नंदनवनच्या आराधनानगरात क्रूर पालटकरने स्वत:च्या मुलासह, सख्ख्या बहिणीचे कुटुंब संपवले. ११ जूनच्या भल्या सकाळी हे पाच जणांचे थरारक हत्याकांड उघडकीस आले. तत्पूर्वीच पालटकर फरार झाला. पोलीस ठिकठिकाणी या नराधमाचा शोध घेत होते. तो पंजाबमधील लुधियानात दडून बसला होता. अखेर २१ जूनला पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. २२ जूनला सायंकाळी नागपुरात आणल्यानंतर २३ जूनला त्याला न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्याचा ३० जूनपर्यंत पीसीआर मिळवला. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून हत्याकांड कसे केले, कसा येथून पळाला, त्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर त्याला मृत कमलाकर पवनकरच्या घरी नेले. तेथे पहाटेपर्यंत पोलिसांनी त्याच्याकडून हत्याकांडाचे प्रात्यक्षिक करवून घेतले.बरेचदा पोलीस हत्याकांडाच्या प्रकरणात आरोपीकडून दिवसा प्रात्यक्षिक करून घेतात. मात्र, या क्रूरकर्म्याने घडविलेले आक्रित आणि त्यामुळे नागरिकांच्या मनात धगधगत असलेला असंतोष लक्षात घेता या क्रूरकर्म्याचा अक्कू यादव होऊ शकतो, हे ध्यानात घेत पोलिसांनी दुपारी प्रात्यक्षिक करून घेण्याचे टाळले. शनिवारी मध्यरात्रीनंतर सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून घेतल्यानंतर नंदनवन पोलिसांचा ताफा क्रूरकर्मा विवेक पालटकरला घेऊन कमलाकर पवनकरच्या घरी पोहचला. तेथे त्याने घरात कशा प्रकारे प्रवेश मिळवला. तो कुठे झोपला, मृत पाच जण कुठे झोपले होते. त्याने सब्बल कशी घरात आणली, कशी हत्या केली आणि दार बंद असताना तो तेथून कसा पळून गेला, त्याचे पोलिसांनी प्रात्यक्षिक करून घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ठाण्यात नेले. तेथे पुन्हा त्याच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.

टॅग्स :Crimeगुन्हा