शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: गडचिरोलीच्या शेतमजूर महिलेचे नागपुरात अवयवदान

By सुमेध वाघमार | Updated: August 4, 2023 18:45 IST

Organ donation: अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर महिलच्या अवयवदानासाठी तिच्या नातेवाईकांनी परवानगी देणे हे याचे द्योतक आहे.

- सुमेध वाघमारे नागपूर - अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर महिलच्या अवयवदानासाठी तिच्या नातेवाईकांनी परवानगी देणे हे याचे द्योतक आहे. नातेवाइकांच्या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे शुक्रवारी दोन्ही मूत्रपिंड दान होऊन दोघांना जीवनदान मिळाले.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरड येथील मंदाबाई ठाकरे (५५) त्या अवयव दाताचे नाव. मंदाबाई शेत मजूर होत्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना बरे वाटत नसल्याने जवळच्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. परंतु प्रकृती खालवत असल्याचे पाहून नातेवाइकांनी त्यांना १४ जुलै रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. येथे ‘ब्रेन ट्युमर’ असल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना एम्सचे डॉ.उदित नारंग, डॉ.ओमशुभम असई, डॉ. वरिध कटियार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनिष श्रीगिरीवार व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुचेता मेश्राम या पथकाने मंदाबाईला तपासून त्यांचा ‘मेंदू मृत’ (ब्रेन डेड) झाल्याची घोषणा केली. त्यांचा नातेवाइकांचे अवयवदानासाठी समुपदेशनही केले.

आपल्या माणसाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा हा सल्ला नातेवाइकांना पटला. मंदाबाई यांचे भाऊ  दादाजी राऊत, हिरामण राऊत व नत्थुजी राऊत यांनी अवयवदानाला होकार दिला.  याची माहिती, ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक दिनेश मंडपे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली. नियमानुसार दोन्ही किडनी गरजू रुग्णांना दान करण्यात आले. यकृत प्रत्यारोपणासाठी योग्य नसल्याने ते थांबविण्यात आले.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूरGadchiroliगडचिरोलीHealthआरोग्य