शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

नागपूर की ‘भट्टी’पूर : नवतपाच्या झळांनी शहर तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:53 IST

रविवारनंतर सोमवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. सोमवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. नवतपा सुरू झाल्यानंतर दररोज तापमानात वाढ होत असून २९ तारखेपर्यंत पारा ४७ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागपूर @ ४६.७ : पारा जाणार ४७ अंश सेल्सिअस पार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारनंतर सोमवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. सोमवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. नवतपा सुरू झाल्यानंतर दररोज तापमानात वाढ होत असून २९ तारखेपर्यंत पारा ४७ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.मे महिना सुरू झाल्यानंतर सातत्याने नागपूरचे तापमान वाढत आहे. मागील आठवडाभरापासून तर उष्णतेने अंगाची लाही लाही होत आहे. सोमवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवायला लागला होता. शहरात ४६.७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सरासरीहून तीन अंशांनी अधिक असून २४ तासातच तापमानात ०.२ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. दुपारनंतर उपराजधानीच्या आकाशात काही प्रमाणात ढग दिसून आल्यामुळे उष्णता थोडी कमी होईल असे वाटत होते. परंतु पारा आणखी वाढला. रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतच होते. घरांमध्ये नागरिकांना कूलरमुळेदेखील दिलासा मिळाला नाही. त्यातच अनेक ठिकाणी भारनियमन असल्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिक तर अक्षरश: हैराण झाले होते.नागपूरकरांसाठी परीक्षेचा आठवडाहवामान विभागातर्फे विदर्भात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात उष्णता कायम राहील व तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वाढत्या तापमानामुळे अगोदरच हैराण होत असलेल्या उपराजधानीतील नागरिकांसाठी पुढील काही दिवस परीक्षेचे ठरू शकतात. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २९ मे पर्यंत पारा ४७ अंशांहून अधिक जाऊ शकतो.तारीख            तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)२० मे              ४४.२२१ मे              ४५.६२२ मे             ४६.०२३ मे             ४६.२२४ मे             ४६.०२५ मे             ४६.३२६ मे            ४६.५२७ मे            ४६.७विदर्भातील तापमानकेंद्र                                कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)नागपूर                           ४६.७ब्रम्हपुरी                          ४६.७वर्धा                               ४६.५चंद्रपूर                           ४६.४गडचिरोली                     ४५.८अकोला                         ४५.३अमरावती                      ४५.०यवतमाळ                      ४५.०गोंदिया                          ४४.८वाशीम                         ४३.८बुलडाणा                      ४१.५मे महिन्यातील सर्वाधिक तापमानतारीख               तापमान२३ मे २०१३        ४७.९२३ मे २००५       ४७.६२ मे २००९         ४७.४२५ मे २०१०       ४७.३

टॅग्स :TemperatureतापमानVidarbhaविदर्भ