शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  एकाला जन्मठेप, तिघांना १० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:21 IST

विशेष सत्र न्यायालयाने संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात एका आरोपीला कमाल जन्मठेप तर, तीन आरोपींना कमाल १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, सर्वांना एकूण ३० लाख रुपयांवर दंड ठोठावला. न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे संघटित गुन्हेगारीला जोरदार दणका बसला आहे.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : संघटित गुन्हेगारीला जोरदार दणका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात एका आरोपीला कमाल जन्मठेप तर, तीन आरोपींना कमाल १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, सर्वांना एकूण ३० लाख रुपयांवर दंड ठोठावला. न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे संघटित गुन्हेगारीला जोरदार दणका बसला आहे.दीपक अनिल आवळे (३०), सुनीता किशोर कुलकर ऊर्फ सुनीता दीपक आवळे (३०), पुष्पा उमाशंकर निखारे (४५) व राजा ऊर्फ सुमित वासुदेव फुलझेले (२८), अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी प्रमुख आरोपी दीपकला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. न्यायालयाने या चारही आरोपींना भादंविच्या कलम ३४२, ३६३, ३८६, ४२०, १२०-ब व मोक्का कायद्याच्या कलम ३(१)(कक), ३(२), ३(४) अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.असे आहे प्रकरणसिद्धार्थ खोब्रागडे असे फिर्यादीचे नाव असून, ते जरीपटका येथील रहिवासी आहेत. तक्रारीनुसार, मार्च-२०१६ मध्ये खोब्रागडेंना आरती जयस्वाल नावाच्या महिलेचा फोन आला. त्यानंतर ती वारंवार फोन करीत होती. त्यामुळे खोब्रागडे व तिची फोनवर मैत्री झाली. त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. वारंवार भेटल्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. खोब्रागडेंनी तिला लग्नाची मागणी घातली. महिलेने लग्नासाठी होकार दिला. दरम्यान, त्यांनी काहीवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एक दिवस आरोपींनी दोघांनाही एका खोलीत पकडले व बलात्काराची तक्रार नोंदविण्याची धमकी देऊन खोब्रागडेंकडून लाखो रुपये उकळले. आरोपी याच पद्धतीने श्रीमंत व्यक्तींना हेरून व त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून मोठमोठी रक्कम उकळीत होते. मानकापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर