शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अधिकाऱ्याचा पैसे खाण्याचा अनोखा ‘वे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अधिकाऱ्यांकडून पैसे खाण्याचे टेक्निक बरेचदा ते अ‍ॅण्टीकरप्शनमध्ये पकडल्यानंतर वाचायला मिळते. पण काही अधिकारी अतिशय हुशार असतात, पैसे घेताना कोण कधी कशी वाट लावेल, याची भीती त्यांना असते. त्यामुळे या हुशार अधिकाऱ्यांचा पैसे घेण्याचा ‘वे’ (मार्ग) सुद्धा अनोखा असतो. शिक्षण विभागातील एक अधिकारी अ‍ॅण्टी करप्शनच्या नाही, पण ...

ठळक मुद्देशिक्षण विभागातील एक अधिकारी चर्चेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अधिकाऱ्यांकडून पैसे खाण्याचे टेक्निक बरेचदा ते अ‍ॅण्टीकरप्शनमध्ये पकडल्यानंतर वाचायला मिळते. पण काही अधिकारी अतिशय हुशार असतात, पैसे घेताना कोण कधी कशी वाट लावेल, याची भीती त्यांना असते. त्यामुळे या हुशार अधिकाऱ्यांचा पैसे घेण्याचा ‘वे’ (मार्ग) सुद्धा अनोखा असतो. शिक्षण विभागातील एक अधिकारी अ‍ॅण्टी करप्शनच्या नाही, पण लोकमतच्या दृष्टीस आला आहे. परंतु त्या अधिकाऱ्याच्या पैसे घेण्याच्या अनोख्या शैलीची चर्चा अख्ख्या यंत्रणेत आहे.शिक्षणासारखे पवित्र माध्यम आज भ्रष्टाचाराने बरबटले आहे, हे उघडपणे बोलले जाते. परंतु देणाऱ्याचेही काम होत असल्याने तक्रारींच्या भानगडीत कुणी पडत नाही. देणाऱ्यालाच नाही, तर घेणाऱ्याला काय अडचण. मात्र यातून चुकीच्या प्रकाराला, नियमबाह्य कामाला बळ मिळते. कुणी तक्रार करीत नसल्यामुळे वरिष्ठ अ‍ॅक्शन घ्यायला तयार नसतात आणि एकाच माळेचे सर्व मणी असल्याने एकमेकाच्या मागे कुणी लागत नाही. पण गेल्या काही वर्षामध्ये अ‍ॅण्टीकरप्शनची भीती अधिकाऱ्यांमध्ये आहे. आपण दूर राहूनच काम करायचे अशी भूमिका अधिकाºयांनी घेतली आहे. त्यातून पैसे घेण्याचे वेगवेगळे ‘वे’ पुढे आले आहे.सिव्हील लाईन परिसरातील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात शिक्षण विभागातील एक अधिकारी अशाच वेगळ्या ‘वे’ ने पैसे घेताना लोकमतच्या दृष्टीस पडला. हे फार क्षणात झाल्याने त्याचे चित्रण करता आले नाही. पण प्रशासकीय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असेल तर नक्कीच ही बाब पुढे येऊ शकते.

अशी घडली घटनाविभागीय आयुक्त कार्यालय परिसरात एका अधिकाऱ्याच्या चालकाने पार्क केलेली गाडी काढली. लगेच संबंधित अधिकारी गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसले. चालक गाडी बाजूला पार्क करून गाडीच्या बाहेर उभा राहिला. अचानक एक संस्थाचालक आला. त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. खिशातून रक्कम काढली. गाडीत टाकली. गाडीचे मागचे दार बंद केले. पुन्हा सामोरचे दार उघडले. अधिकाऱ्याशी हस्तांदोलन केले. आणखी काही सेवा अशी विचारणा केली. अधिकारी पुढे निघाले आणि संस्थाचालकानेही परतीचा मार्ग धरला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी