शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

नागपुरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत घट मात्र रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 09:45 IST

corona Nagpur News नागपुरात मंगळवारी २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन ८९८ वर पोहचली. आतापर्यंत ७०,७६७ रुग्णांनी कोविडवर मात केली.

ठळक मुद्दे २३ मृत्यूची व ८९८ रुग्णांची भर७०,७६७ रुग्णांनी केली कोविडवर मात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही १० हजाराच्या आत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येणार केव्हा, असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना कमी होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने काहीसा दिलासदायक चित्र निर्माण झाले आहे. मंगळवारी २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन ८९८ वर पोहचली. आतापर्यंत ७०,७६७ रुग्णांनी कोविडवर मात केली. विशेष म्हणजे, उपचार घेत असलेल्या म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही १० हजारांच्या खाली आली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ८३,१०५ व मृतांची संख्या २,६८२ झाली आहे.कोरोनाला अटकाव करण्यासाठी जास्तीत जास्त चाचणी होण्याची गरज आहे. परंतु मागील काही दिवसांत चाचण्यांची संख्या मंदावली होती. परंतु आज पुन्हा चाचण्यांचा वेग वाढला. शहरात २९३४ तर ग्रामीणमध्ये २९५ असे एकूण ३२२९ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. शिवाय, रॅपिड अँटिजेन चाचण्या शहरात १,५७९ तर ग्रामीणमध्ये २,९७७ असे एकूण ४,५५६ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. एकूण ७,७८५ चाचण्या झाल्या. अँटिजेन चाचणीतून ३४२ बाधित रुग्ण आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीत ५५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.-बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिकमागील दोन आठवड्यांपासून बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. आज १४२५ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ८५.१५ टक्क्यांवर पोहचले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला हे प्रमाण ४१ टक्क्यांवर आले होते. सध्या शहरातील ५६,८९८ तर ग्रामीणमधील १३,८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ९,६५६ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.-पुन्हा मेडिकलमध्ये एकच रुग्ण बाधितमेडिकलच्या प्रयोगशाळेत आज ५११ रुग्णांच्या चाचण्यांमधून केवळ एक रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले, तर ५१० रुग्ण निगेटिव्ह आले. मागील चार दिवसांपासून हेच चित्र आहे. या सोबतच एम्समध्ये ३१९ चाचण्यांमधून ३९, मेयोत ७०७ चाचण्यांमधून ६७, माफसूमध्ये ७५ चाचण्यांमधून १९, नीरीमध्ये १९६ चाचण्यांमधून ३५ तर खासगी लॅबमधून १४२१ चाचण्यांमधून ३९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या