शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

CoronaVirus in Nagpur : नागपुरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 22:58 IST

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. सोमवारी १,५५० नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची संख्या ४१,०३२वर पोहचली. उपचारादरम्यान ५० रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे१,५५० रुग्णांची भर : ५० रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. सोमवारी १,५५० नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची संख्या ४१,०३२वर पोहचली. उपचारादरम्यान ५० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १,३६५ झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १,२५०, ग्रामीणमधील २९४ तर जिल्ह्याबाहेरील सहा आहेत. आज १,३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. मेडिकलमध्ये ऑक्सिजन पाईपलाईनचे काम चौथ्या दिवशीही सुरू होते. यामुळे भरतीसाठी आलेल्या व आॅक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना मेयोमध्ये पाठविले जात होते. रात्री ८ वाजेपर्यंत मेयोमधील कोविडच्या सर्व खाटा फुल्ल झाल्या होत्या. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये व शालिनीताई मेघे हॉस्पिटल या दोनच ठिकाणी मोजक्या खाटा उपलब्ध होत्या. यावरून नागपुरातील भीषण स्थितीचा अंदाज येतो. खासगी हॉस्पिटलमध्ये खाटा मिळविण्यासाठी मनपाच्या हेल्प लाईननंबरवर रोज शेकडो फोन येत असल्याचे, अनेकांना खाट मिळत नसल्याचे येथील एका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.अ‍ॅन्टिजन चाचणीत ६५३ रुग्ण पॉझिटिव्हमनपाच्या झोननिहाय रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. सोमवारी १,९९३ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ६५३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३,३८१ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या, यात १,१९७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेतून पाच, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४४, मेयोच्या प्रयोगशाळेतून ३७१, माफसूच्या प्रयोगशाळेतून ७४ तर खासगी लॅबमधून ३३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज शहरात एकूण ५,३७४ चाचण्या झाल्या. यात ३,८२४ रुग्ण निगेटिव्ह आले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून चाचण्यांची संख्या घसरल्याचे दिसून येत आहे.शहरात ३७, ग्रामीणमध्ये सात मृत्यूजिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीणमध्ये मृत्यूचे सत्र सुरू आहे. आज शहरात ३७, ग्रामीणमध्ये सात तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्णांचे मृत्यू झाले. आतापर्यंत शहरात १०४९, ग्रामीणमध्ये १९२ तर जिल्ह्याबाहेरील १२४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. दिलासादायक म्हणजे, २८,६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून याचे प्रमाण ६९.८४ टक्के आहे. सध्या ११,००९ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात शहरातील ७,३४२ तर ग्रामीणमधील ३,६६७ रुग्ण आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ५,३७४बाधित रुग्ण : ४१,०३२बरे झालेले : २८,६५८उपचार घेत असलेले रुग्ण : ११,००९मृत्यू :१,३६५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर