शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात सहारेने स्वत:च केला गोळीबार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:10 IST

प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांना अडकविण्यासाठी आणि स्वत:ची मानगूट गंभीर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी वाडीतील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय ३०) आणि त्याच्या भावाने स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव केला होता. प्रत्यक्षात गोळीबार सहारेवर झालाच नाही. उलट सहारेनेच त्याच्या विरोधी टोळीतील मयूर गुरुदेव मुरार (वय १७) नामक युवकावर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी केले होते, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

ठळक मुद्देजखमी तरुणाची तक्रार : प्रकरणाला कलाटणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांना अडकविण्यासाठी आणि स्वत:ची मानगूट गंभीर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी वाडीतील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय ३०) आणि त्याच्या भावाने स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव केला होता. प्रत्यक्षात गोळीबार सहारेवर झालाच नाही. उलट सहारेनेच त्याच्या विरोधी टोळीतील मयूर गुरुदेव मुरार (वय १७) नामक युवकावर गोळी झाडून त्याला गंभीर जखमी केले होते, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. जखमी मयूरने पोलिसांकडे तक्रार दिल्याने या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. त्यावरून पोलिसांनी भारत सहारे, त्याचा भाऊ सचिन (वय ३२) आणि सतीश (वय ३३) तसेच त्यांचा साथीदार राहुल गणेश कुडसुले या चौघांना अटक केली. या नाट्यमय घटनाक्रमाची माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.२० जानेवारीच्या पहाटे १.३० च्या सुमारास आठ ते नऊ स्कार्फ बांधलेले आरोपी आमच्या घरावर चालून आले आणि त्यांनी स्वीफ्ट कारची मागची काच फोडली. त्यांच्याकडे मी आणि माझ्या साथीदारांनी धाव घेतली असता आरोपींनी आमच्या दिशेने हवेत गोळीबार करून पळ काढला, अशी माहिती भारत सहारे याने वाडी पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षात फोनवरून दिली होती. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तेथे दोन रिकामी आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, जिवंत काडतुसांची बाब पोलिसांना खटकत होती. आरोपी जिवंत काडतुसे कशाला घटनास्थळी टाकून देतील, असा पोलिसांना प्रश्न होता. त्याआधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली.चौकशीत समजली भलतीच माहिती१६ जानेवारीला मयूर मुरार (रा. दिघोरी) आणि आकाश दिनेश राऊत हे दोघे कुख्यात सहारेच्या घराजवळ राहणारा त्यांचा मित्र बादल रामटेके याला भेटण्यासाठी गेले होते. तेथे सहारेच्या गटातील गुंडांसोबत वाद झाल्याने आरोपींनी मयूर आणि आकाशला बेदम मारहाण केली. त्याचा बदला घेण्यासाठी मयूर, आकाश, निकेश कमलेश ठाकरे (दोघेही रा. खरबी, नंदनवन) आपल्या पाच अल्पवयीन साथीदारांसह २० जानेवारीच्या पहाटे कुख्यात सहारेच्या घरावर हल्ला करण्यासाठी पोहचले. भारत सहारे, त्याचे दोन भाऊ आणि साथीदार यावेळी संदीप क्षीरसागर नावाच्या साथीदाराची बर्थ डे पार्टी करीत होते. घरातील सीसीटीव्हीत त्यांना ८ ते ९ स्कार्फ बांधलेले तरुण कारची तोडफोड करताना दिसताच कुख्यात सहारे आणि त्याचे साथीदार घरातील पिस्तूल घेऊन त्यांच्याकडे धावले. सहारेने केलेल्या गोळीबारात एक गोळी मयूरच्या पोटरीतून आरपार केली. त्यामुळे तो जबर जखमी झाला. ते पाहून तो आणि त्याचे मित्र घाबरले आणि पळून गेले. मयूरने एका डॉक्टरकडे उपचार घेतले. ही माहिती पोलिसांना कळली. त्यावरून पोलिसांनी मयूरचा पत्ता शोधला अन् तो सापडताच गोळीबाराचा उलगडा झाला.पोलिसांच्या उपस्थितीतच टाकली काडतुसेमयूरवर गोळी झाडणाऱ्या  कुख्यात सहारेला या गंभीर गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ शकते, याची कल्पना होती. त्यामुळे त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी षडयंत्र रचले. त्यानुसार, स्वत:वर हल्ला आणि गोळीबार झाल्याचा कांगावा करून त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर गोळीबार कुणी केला त्याची चौकशी करण्यासाठी सहारेच्या घराची झडती घेतली तेव्हा त्याच्या घरातून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. ती जप्त करून पोलिसांनी भारत, सचिन आणि सतीश सहारे, राहुल कडसुले आणि जीवन दिलीप मोहिते या पाच गुंडांना अटक केली. ते पोलीस कोठडीत असून, त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात असल्याचेही सहआयुक्त बोडखे यांनी सांगितले.हा एकच गुन्हा नाही या गुन्ह्यासोबत आणखी दोन गुन्हे सहारे आणि त्याच्या साथीदारांवर दाखल करण्यात आले. तर, सहारेच्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या आकाश राऊत, निकेश ठाकरे आणि त्यांच्या पाच विधिसंघर्षग्रस्त साथीदारांवरही सहारेच्या तक्रारीवरून गैर कायद्याची मंडळी जमवून हल्ला करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, प्रशांत चौगुले, संजय चव्हाण, सहायक उपनिरीक्षक राजकुमार देशमुख, अविनाश तायडे, हवालदार सुनील चौधरी, अफसर खान, रमेश उमाटे, नरेश रेवतकर, सुरेश ठाकूर, नरेश सहारे, राजेंद्र सेंगर, देवीप्रसाद दुबे, नायक राजेश ठेंगुरीया, रवींद्र बारई, राहुल इंगोले, मंगेश मडावी, आशिष देवरे आणि नीलेश वाडेकर यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Firingगोळीबारnagpurनागपूर