शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत, देवेंद्र फडणवीसांकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 13:10 IST

या दुःखद प्रसंगी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूर : नागपुरात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्फोट झाला असून या प्रकरणी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केला आहे. "नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टमध्ये दुर्घटनेविषयी माहिती देत म्हटलं आहे की, "नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे."

दरम्यान, या दुर्घटनेत तब्बल ९ कामगारांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सोलार कंपनीच्या स्फोटातील मृतकांची नावे

१. युवराज किसनाजी चारोडे, बाजारगांव२.ओमेश्वर किसनलल मछिर्के, चाकडोह ३  मिता प्रमोद उईके, अंबाडा सोनक काटोल४. आरती निळकंठा सहारे, कामठी  ५. श्वेताली दामोदर मारबते, कन्नमवार ग्राम, वर्धा ६. पुष्पा श्रीरामजी मानापुरे, शिराळा, अमरावती  ७. भाग्यश्री सुधाकर लोणारे, भुज  ब्रम्हपुरी  ८. रुमीता विलास उईके, ढगा वर्धा ९. मोसम राजकुमार पटले, पांचगांव भंडारा.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरBlastस्फोट