शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपुरात चेन नेटवर्किंगच्या नावाखाली डॉक्टरांसह लब्धप्रतिष्ठितांचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:51 IST

चेन मार्केटिंगच्या नावाखाली विविध प्रकारचे लाभ आणि घरबसल्या लाखोंचा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या क्यू नेट कंपनीचा गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने भंडाफोड केला आहे. या कंपनीतील दोन डॉक्टरांसह १० आरोपींवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसोयीसुविधा अन् लाखोंचे आमिषशेकडो जणांना गंडाआर्थिक गुन्हे शाखेने केला भंडाफोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेन मार्केटिंगच्या नावाखाली विविध प्रकारचे लाभ आणि घरबसल्या लाखोंचा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या क्यू नेट कंपनीचा गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने भंडाफोड केला आहे. या कंपनीतील दोन डॉक्टरांसह १० आरोपींवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे चेन नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्या   कंपन्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.आरोपी डॉ. कविता खोंड, मृणाल धार्मिक, प्रशांत धार्मिक, आशिष लुणावत, किशोर भंडारकर, मंगेश चिकारे, रुतुजा चिकारे, प्रशांत डाखोळे (डाखोडे), प्रज्ञा डाखोळे आणि श्रीकांत रामटेके यांनी काही वर्षांपूर्वी क्यू नेट नामक कंपनी सुरू केली. या कंपनीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी अभिकर्तेही नेमले. या कंपनीचे सभासद बनलेल्यांना देश-विदेशात पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, शॉपिंग, कॉर्पोरेट फायनान्स, टेलिकम्युनिकेशन, ई-कॉमर्स, लाईफ स्टाईलसोबतच विविध कंपन्यांच्या उत्पादनाची माहिती दिली जात होती. कंपनीची क्यू व्हीआयपी क्लब मेंबरशिप घेतल्यास मिळणाऱ्या   सुविधांमध्ये मोठी सूट तसेच मोफत भेटवस्तू देण्याचेही प्रलोभन दाखविले जात होते. एक सभासद बनल्यास त्याला आणखी सभासद आणि त्या सभासदाला पुन्हा तसेच आमिष दाखवून दुसरे सभासद बनवून (ग्राहकांची साखळी) वेगवेगळ्या आर्थिक फायद्याचीही माहिती दिली जात होती. एका सभासदाच्या उलाढालीवर थेट १० टक्के कमिशन देण्याचे आमिष मिळाल्यामुळे ते मिळविण्यासाठी सभासद झालेली मंडळी आणखी ग्राहकांना या कंपनीशी संलग्न करायची. अशाप्रकारे ग्राहकांची संख्या वाढवून उपरोक्त आरोपी बक्कळ पैसा जमवत होते. उपरोक्त आरोपींनी नागपूरसह ठिकठिकाणांहून अशाप्रकारे शेकडो ग्राहकांना कंपनीशी जोडले.बनवाबनवीचा कळसवेगवेगळे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना क्यू नेट कंपनीशी जोडणाºया आरोपींनी कंपनीच नव्हे तर सभासदांच्या नावे याहू संकेतस्थळावर बनावट मेल आयडी तयार केले. आम्ही तुमची रक्कम वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतविली असून, त्याचा लाभांश विशिष्ट प्रकारे मिळतो, असे ते सांगायचे. गुंतवणूकदारांना त्याच्या खात्यात पॉर्इंटच्या रूपाने रक्कम जमा होत असल्याचेही बनावट मेल ते पाठवीत होते. प्रत्यक्षात ते क्यू नेटमध्ये त्यांची रक्कम जमाच करीत नव्हते. स्वत:च ती रक्कम वापरत असल्याने आपली रक्कम परत घ्यायला गेलेल्यांना ते वेगवेगळे कारण सांगून टाळत होते. आंचल एस. लाल (वय ४९, रा. स्वावलंबीनगर) यांनी अशाच प्रकारे आपली ९ ते १३ लाख रुपयांची मागणी केली असता, आरोपींनी त्यांना टाळले.पाच वर्षांत पाच कोटीपाच वर्षे वाट बघा, नऊ ते दहा लाखांचे पाच कोटी रुपये मिळतील, असे ते सांगत होते, असे समजते. त्यामुळे लाल यांनी २०१५ मध्ये गुन्हे शाखेत तक्रार नोंदविली. अलीकडे अन्य ११ जणांनी अशाच प्रकारची तक्रार उपरोक्त आरोपींविरुद्ध नोंदविली. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. डी. शेख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. उपरोक्त आरोपींनी एकूण १२ जणांची ९३ लाख २१ हजार २५६ रुपयांनी फसवणूक केल्याचे पुरावे हाती लागल्यानंतर, सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.डॉक्टर, प्रोफेसर गजाआडआरोपी डॉ. कविता खोंड, डॉ. मृणाल धार्मिक, प्रशांत धार्मिक, आशिष लुणावत, किशोर भंडारकर, मंगेश चिकारे, रुतुजा चिकारे, प्रशांत डाखोळे (डाखोडे), प्रज्ञा डाखोळे आणि श्रीकांत रामटेके यांच्यापैकी डॉ. कविता खोंड आणि मृणाल धार्मिक या आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रोफेसर आहेत. प्रशांत आणि प्रज्ञा डाखोळे हे दाम्पत्य डॉक्टर असून, त्यांचे क्लिनिक असल्याचेही समजते. पोलिसांनी आज सायंकाळी डॉ. कविता खोंड, डॉ. मृणाल धार्मिक आणि डॉ. प्रशांत तसेच डॉ. प्रज्ञा डाखोळे या पाच जणांना अटक केली. त्यांची उद्या पोलीस कोठडी मिळविली जाणार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर