शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

नागपुरात प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:34 IST

प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या एका १६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह तिघांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील पाण्याच्या टाक्यात फेकून दिला. कोणताही धागादोरा नसताना नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून चिपडी (कुही) गावातील तिघांना अटक केली.

ठळक मुद्देनंदनवन पोलिसांनी लावला छडा कुहीजवळच्या तीन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या एका १६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह तिघांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील पाण्याच्या टाक्यात फेकून दिला. कोणताही धागादोरा नसताना नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून चिपडी (कुही) गावातील तिघांना अटक केली. रोहित शांताराम रंगारी (वय १६) असे मृत मुलाचे तर, त्याची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे शानू ईकबाल शेख (वय २२), विक्की ऊर्फ विराज मधुकर पाटील (वय १९) अशी असून, यात आणखी एका अल्पवयीन गुन्हेगाराचाही समावेश आहे. मृत आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. या खळबळजनक प्रकरणाची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण उपस्थित होते.रोहितने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. आरोपी शानूचे चपलेचे दुकान असून, दुसरा आरोपी विक्की कुलर दुरुस्तीचे काम करतो. रंगारीच्या बहिणीसोबत गावातीलच आरोपी शानू शेख याचे प्रेमसंबंध होते. ते माहीत पडल्याने रोहित शानूचा राग करायचा. त्याने बहिणीलाही दम दिला होता. शानूला भेटल्यास गंभीर परिणाम होतील,असे म्हटले होते. चिपडी छोटेसे गाव आहे. प्रेयसीचा भाऊ विरोधात गेल्याने शानूच्या प्रेमसंबंधात अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे शानू संतप्त झाला. त्याने त्याचा मित्र विक्की पाटील आणि एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने रोहित रंगारीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार, आरोपी शानूने विक्कीच्या माध्यमातून रंगारीला नागपुरात पार्टी करू म्हणून हट्ट धरला. त्यानुसार, २२ मार्चला रात्री दुचाकीने विक्की व अन्य एका आरोपीसोबत रंगारी नागपुरात आला. शानूही मागून आला. हे सर्व मोमीनपुऱ्यात गेले. तेथे त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण घेतले.जेवण घेतल्यानंतर मोमीनपुºयातून आरोपींनी रोहित रंगारीला विक्कीचा अंतुजीनगरातील चुलत भाऊ आशिष पाटील याच्या रूमवर नेले. तेथे आरोपींनी रोहित रंगारीला बेदम मारहाण केली. त्यानंतर वाठोड्याजवळच्या डम्पिंग यार्डमध्ये नेले. तेथे शानूने रंगारीच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला चढवून त्याला ठार मारले आणि त्याचा मृतदेह सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये फेकून आरोपी पळून गेले. २४ मार्चला रात्रीच्या वेळी तेथील कर्मचाऱ्यांना मृतदेह पाण्यावर दिसल्याने कर्मचाºयांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नंदनवन पोलिसांना कळविले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.

असा मिळवला धागाडॉक्टरांनी मृताच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाल्याचा तसेच हा हत्येचा प्रकार असल्याचे नंदनवन पोलिसांना सांगितले. ठाणेदार चव्हाण यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त रौशन यांना दिली. मृताची ओळख पटविणारे कोणतेही साधन नव्हते. त्यामुळे डीडीपी रौशन यांनी ठाणेदार चव्हाण. पोलीस निरीक्षक अरविंद भोळे आणि त्यांच्या सहकाºयांना शहर तसेच जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची यादी मागवून घ्यायला सांगितली. पोलिसांना मिळालेल्या यादीत कुहीतून २२ मार्च २०१९ पासून बेपत्ता झालेल्या रोहित रंगारीचे वर्णन मिळतेजुळते वाटल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. त्यांनी तो मृतदेह रोहित रंगारीचाच असल्याचे सांगितले.

आरोपीचे मदत करण्याचे नाटकमृताची ओळख पटल्याने पोलिसांचा तपासाचा मार्ग सोपा झाला. पोलिसांनी गुन्ह्याच्या दिवशी तो कुणासोबत होता. डम्पिंग यार्ड परिसरात २२ मार्चला कुणाचे लोकेशन दिसते, ते तपासले. त्या आधारे पोलिसांनी शानू आणि विक्की तसेच अन्य एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. या तिघांवर प्रश्नांची सरबत्ती करताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच घटनाक्रमही उलगडला. विशेष म्हणजे, रोहित रंगारी गावातून एकाएकी बेपत्ता झाल्यामुळे त्याचे नातेवाईक आणि वस्तीतील मंडळी त्याचा इकडेतिकडे शोध घेऊ लागले. यावेळी आरोपी शानूदेखील आपल्या मोबाईलवर रोहित रंगारीचा फोटो दाखवून त्याचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे नाटक करीत होता, असे एका प्रश्नाच्या उत्तरात रौशन यांनी पत्रकारांना सांगितले.कोणताही पुरावा नसताना या हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्याची कामगिरी उपायुक्त रौशन, सहायक आयुक्त घार्गे, सहायक आयुक्त धोपावर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण, निरीक्षक अरविंद भोळे आणि त्यांच्या सहकाºयांनी बजावली.

टॅग्स :Murderखून