शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठ्यात कपात करून नागपूर मनपाची पाणीबचत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:16 IST

कन्हान नदी व तोतलाडोहातील पाणी पातळी खालावल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवण्याचे महापालिकेकडे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देदरवर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कन्हान नदी व तोतलाडोहातील पाणी पातळी खालावल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवण्याचे महापालिकेकडे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांना थेंब थेंब पाण्याची बचत करण्याचा संदेश देण्यासोबतच महापालिकेचा जलप्रदाय विभाग पाण्याची बचत करीत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शहराला दररोज ७४० एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा जातो. परंतु तूर्त ६९० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अधिकृतपणे यासंदर्भात माहिती देण्याचे टाळले जात आहेदरम्यान, ज्या भागात २४ बाय ७ पाणीपुरवठा होत होता अशा भागातही पाणीपुरवठा कमी केल्याची माहिती आहे, तर काही भागातील पाणीपुरवठ्यात कपात करण्यासाठी दबाव वाढल्याची माहिती आहे. शहरलगतच्या भागातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करून एक तास करण्यात आली आहे. दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक ांना पुरेसे पाणी मिळत नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.सोमवारी १३ मे रोजी महापौर नंदा जिचकार, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके व आयुक्त अभिजित बांगर, पाणीपुरवठयाची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यूचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.टिल्लू पंपांचा सर्रास वापरशहरातील पाणीतूट ५० टक्क्यापर्यंत आहे. यात सुधारणा झाली असती तर शहरातील पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी झाले असते. मानकाच्या तुलनेत शहरात दराडोई अधिक पाणीपुरवठा होत आहे. अवैध टिल्लू पंपांचा सर्रास वापर सुरू आहे. शुक्रवारी लकडगंज, आसीनगर झोन क्षेत्रात प्रत्येकी तीन टिल्लू पंप जप्त केले, तर नेहरूनगर व सतरंजीपुरा झोन भागात चार बूस्टर पंप जप्त करण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई