शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

नागपूरच्या मनपा रुग्णालयात अल्प दरात ४९ प्रकारच्या तपासण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:06 IST

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ रुग्णालये सुसज्ज करण्यात आलेली असून येथे ४९ प्रकारच्या तपासण्या २० ते १५० रुपये शुल्कात होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोमवारी महापालिकेच्या सदर येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे१० ते १५० रुपये शुल्क : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ रुग्णालये सुसज्ज करण्यात आलेली असून येथे ४९ प्रकारच्या तपासण्या २० ते १५० रुपये शुल्कात होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोमवारी महापालिकेच्या सदर येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते करण्यात आले.महापालिक रुग्णालय व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना गरज असल्यास प्रयोगशाळा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्त किंवा लघवीचे नमुने घेऊन केंद्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करून रिपोर्टस् संबंधित रुग्णालयात पाठविला जाणार आहे. या सर्व चाचण्यांसाठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे. तपासणीसाठी नोंदणी शुल्क १० रुपये असून इतर तपासण्या २० रुपयांपासून ते जास्तीत जास्त १५० रुपयांपर्यंत आहेत. खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत अशा तपासणीसाठी हजारो रुपये द्यावे लागतात. महापालिका व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये ६ डिसेंबर २०१७ ला सामंजस्य करार झाला. या करारांतर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासह केंद्रीय प्रयोगशाळा उघडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात आले आहे.महापालिकेतर्फे आरोग्य, शिक्षण यासारख्या अनेक सेवा दिल्या जातात. मात्र त्यांना सतत नावच ठेवले जाते. या सेवांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी टाटा ट्रस्टने मदतीचा हात दिल्याने आता महापालिकेच्या रुग्णालयांची नवी ओळख निर्माण करणार आहे. टाटा ट्रस्टने मनपा रुग्णालयांमधील सुविधांचा केलेला कायापालट हा नागरिकांचा मनपाच्या आरोग्य सेवेबाबतचा दृष्टिकोन बदलविणारा ठरणार असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.याप्रसंगी महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रगती पाटील, आरोग्य सभापती मनोज चापले, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेवक सुनील अग्रवाल, किशोर जिचकार, निशांत गांधी, शिल्पा धोटे, वैद्यकीय आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, सदर रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, दंतरोग तज्ञ डॉ. साकीब पटेल आणि डॉ. शबीना पटेल, डॉ. अंजुम बेग, डॉ. विजय जोशी, डॉ. आंबेराय, डॉ. चारू बाहेती, डॉ. सुरेश बत्रा, टाटा ट्रस्टचे सिनियर पॅथॉलॉजिस्ट डॉ. टिकेश बिसेन, डॉ. रिजेश बोस, अमर नावकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक चिव्हाणे यांनी तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.महापौरांनी केली रक्त तपासणीकेंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेच्या उद्घाटनानंतर नंदा जिचकार यांनी प्रयोगशाळेची माहिती जाणून घेतली. त्यांनी स्वत: रक्त तपासणी करून पॅथॉलॉजीचा शुभारंभ केला. यासाठी नागरिकांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना करावयाच्या असलेल्या चाचण्यांचे शुल्क भरावे लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवसभरातच रिपोर्टही मिळणार आहे. विशेष म्हणजे, नोंदणीपासून ते संपूर्ण प्रक्रियेबाबतच्या भरलेल्या शुल्कासह माहिती नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे.दंत विभागाची महापौरांकडून पाहणीसदर रुग्णालयातील अत्याधुनिक दंत विभागाचीही जिचकार यांनी पाहणी केली. दंत विभागातील सर्व सुविधांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. दंत विभागात दातांविषयीचे सर्व उपचार अत्यंत कमी दरात केले जातात. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना विभागात नि:शुल्क उपचार दिले जात असून वेळोवेळी दंत तपासणी शिबिर घेण्यात येतात, अशी माहिती यावेळी दंत विभागाचे प्रभारी डॉ. साकीब पटेल व डॉ. शबीना पटेल यांनी यावेळी महापौरांना दिली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHealthआरोग्य