शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नगरसेविकेने उधळला नवऱ्याचा ‘व्हॅलेंटाईन डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:49 IST

प्रेमाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, ते नैतिक मर्यादेत हवे. प्रेमाच्या नावावर कुणी नैतिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ हा घडणारच. असाच प्रकार बुधवारी छत्रपती चौकात घडला.

ठळक मुद्दे छत्रपती चौकात रंगेहात पकडले : नवरोबासह त्याच्या प्रेयसीलाही दिला चोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, ते नैतिक मर्यादेत हवे. प्रेमाच्या नावावर कुणी नैतिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ हा घडणारच. असाच प्रकार बुधवारी छत्रपती चौकात घडला. विवाहित असूनही प्रेयसीसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करायला निघालेल्या एका तरुणाला त्याच्या नगरसेविका असलेल्या पत्नीने रंगेहात पकडून दोघांनाही चांगलीच अद्दल घडवली.भाजपाच्या एका नगरसेविकेला गेल्या काही महिन्यांपासून तिच्या नवऱ्याचे बाहेर प्रेमप्रकरण असल्याची शंका होती. मात्र पुरावा काही सापडत नव्हता. अशातच व्हॅलेंटाईन डे आला. या दिवशी आपला पती प्रेयसीला भेटणार असा ठाम अंदाज या नगरसेविकेला होता. म्हणून ती सकाळपासूनच पतीच्या पाळतीवर होती. गिट्टीखदान येथील घरातून पती बाहेर पडताच पत्नीही गाडीने त्याचा पाठलाग करू लागली. अखेर पती छत्रपती चौकात थांबला. येथे त्याची प्रेयसी आधीपासून वाट बघत होती. पती प्रेयसीला गुलाबाचे फूल व भेटवस्तू देणार तोच नगरसेविका  पत्नीने चंडिकेचे रूप धारण करीत नवरा व त्याच्या प्रेयसीला चांगलाच चोप दिला. यावेळी पतीनेही विरोध केल्याने दोघात थोडावेळ झटापट झाली.गोंगाटामुळे थोड्याच वेळात बघ्याची गर्दी जमली. प्रेमप्रकरणाचा भंडाफोड झाल्याने पतीराज गोंधळले. प्रसंगावधान राखून बदनामीच्या भीतीने त्याने लगेच येथून काढता पाय घेतला. पतीपाठोपाठ पत्नीही लगेच निघून गेली. मात्र नगरसेविके ने पतीला चोप दिल्याची चर्चा थोड्याच वेळात शहरात पसरली. माहिती जाणून घेण्यासाठी अनेकांनी प्रभाग ३५ व प्रभाग ३६ मधील भाजपाच्या नगरसेवकांशी संपर्क साधला, परंतु शोध लागत नव्हता. मात्र काही प्रत्यक्षदर्शींनी नगरसेविका गिट्टीखदान भागातील असल्याचे सांगितले. वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी या संदर्भात संपर्क साधला असता नगरसेविके च्या पतीने असा कुठलाही प्रकार घडलेला नाही, असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. बदनामीच्या भीतीने या संदर्भात पोलीस स्टेशनलाही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रातील भाजपा नगरसेवकांच्या मंगळवारी बैठकी घेण्यात आल्या. यात नगरसेवकांना आपले आचरण सुधारण्याचा सल्ला दिला गेला असतानाच दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा आहे.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेnagpurनागपूर