शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेमुळे नागपूर मनपाची होणार ५३५ कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:40 IST

महापालिका मुख्यालय, झोनसह अन्य कार्यालय, पाणीपुरवठा केंद्र व शाळांच्या इमारतीवर सौर ऊ र्जा संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा खर्च होणाऱ्या वीज बचतीतून केला जाणार आहे. यातून पुढील काही वर्षात ५३५ कोटींची बचत होणार आहे.

ठळक मुद्देमनपा कार्यालये, पाणीपुरवठा योजनात सौर ऊ र्जा संयंत्र लावणारस्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका मुख्यालय, झोनसह अन्य कार्यालय, पाणीपुरवठा केंद्र व शाळांच्या इमारतीवर सौर ऊ र्जा संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा खर्च होणाऱ्या वीज बचतीतून केला जाणार आहे. यातून पुढील काही वर्षात ५३५ कोटींची बचत होणार आहे.पाणीपुरवठा योजना, कार्यालये व शाळांच्या वीज बिलावर महापालिकेचा वर्षाला १०० कोटींचा खर्च होतो. सौर ऊ र्जा प्रकल्पावर २० वर्षात ९४५ कोटी ३४ लाख ७७ हजार ६०० रुपये खर्च होणार आहे. ही रक्कम २० वर्षात परतफेड करावयाची आहे. यातून ४२ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.तीन कंपन्यांना हे काम विभागून दिले जाणार आहे. यात मे. शांती जी.डी. इस्पात अ‍ॅन्ड पॉवर प्रा.लि.रायपूर, मे. रोहित स्टील नागपूर तसेच मे. ब्राईल सोलर एनर्जी प्रा. लि.चेन्नई आदींचा समावेश आहे. महापालिकेच्या ज्या इमारतीत मीटरनिहाय एक किलोवॅट वा त्याहून अधिक वीज वापर आहे अशा इमारती वा कार्यालयात सौर ऊ र्जा संयंत्र लावण्यात येणार आहे. सौरऊ र्जा संयंत्र उपलब्ध करणे, लावणे, कार्यान्वित करणे, आदी कामे २४० महिन्यात परतफेडीच्या आधारावर करण्यात येणार आहे. यासाठी शर्ती व अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत.प्रति कि.वॅट साठी १२९० रुपयेमहापालिकेच्या इमारती वा कार्यालयांच्या छतावर १ ते ७९० कि.वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संयंत्र बसविण्यात येणार आहे तर पथदिव्यांच्या रस्त्यावर वा महापालिकेच्या योग्य ठिकाणी ६ ते १५ कि.वॅट क्षमतेचे इलेव्हेटेड स्ट्रक्चर उभारण्यात येतील. इलेव्हेटेड स्ट्रक्चरसाठी प्रति कि.वॅट दर महिन्याला १२९० रुपये प्रमाणे २० वर्षात परतफेड करावयाची आहे.पाणीपुरवठा योजनासाठी अधिक क्षमतेचे संयंत्रपाणीपुरवठा केंद्र व मलनिस्सारण केंद्रासाठी अधिक वीज लागते. त्यामुळे या प्रकल्पासाठी अधिक क्षमतेचे ग्राऊं ड माऊं टेड स्ट्रक्चर सौर ऊ र्जा संयंत्र उभारण्यात येतील. याची क्षमता २ हजार ते ४ हजार कि.वॅट राहणार आहे. २० वर्षानंतर हा प्रकल्प महापालिकेला हस्तांतरित केला जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाelectricityवीज