शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाच्या भांडेवाडी मलनिस्सारण केंद्राची क्षमता झाली २०० एमएलडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:48 IST

भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्राची (एसटीपी) क्षमता १०० एमएलडीवरून २०० एमएलडी झाली आहे. जुलै २०१८ पासून वाढीव क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु यासाठी महापालिकेला २०१८-१९ या वर्षात एसटीपी आॅपरेटरला ५० कोटी द्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देक्षमता झाली दुप्पट; पण द्यावे लागेल ५० कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्राची (एसटीपी) क्षमता १०० एमएलडीवरून २०० एमएलडी झाली आहे. जुलै २०१८ पासून वाढीव क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु यासाठी महापालिकेला २०१८-१९ या वर्षात एसटीपी आॅपरेटरला ५० कोटी द्यावे लागणार आहे.खासगी सहभागातून भांडेवाडी येथील एसटीपी केंद्राचा विस्तार करण्यात आला आहे. महापालिकेच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पात एसटीपी केंद्रासाठी ३६ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी आपल्या स्वत:च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी पाच कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर स्थायी समितीनेही पाच कोटींचीच तरतूद कायम ठेवली. २०० एमएलडीचा प्रकल्प जुलै २०१८ मध्ये कार्यान्वित झाल्याने आॅपरेटला मार्च २०१९ पर्यंत ५० कोटी द्यावयाचे आहे. प्रत्येक महिन्याला चार कोटी आॅपरेटरला दिले तर ही रक्कम हप्त्यात देणे शक्य आहे. याबाबतची तरतूद करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. करारानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने आॅपरेटरला ही रक्कम द्यावयाची आहे.या प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येणारे सांडपाणी कोराडी व खापरखेडा येथील विद्युत निर्मिती प्रकल्पांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु भांडेवाडी ते खापरखेडा या दरम्यान पाईप लाईन टाकलेली नाही. त्यामुळे प्रक्रिया करण्यात आलेले पाणी नदीत सोडण्याशिवाय पर्याय नाही.महापालिके ला प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यापासून वर्षाला ३३.५ कोटी उत्पन्न मिळू शकते. कोराडी प्रकल्पाला १०० एमएलडी व खापरखेडा प्रकल्पाला ५०एमएलडी पाणी विकण्याचा प्रस्ताव आहे. परंतु पाईप लाईन टाकण्यासाठी दीड वर्ष लागणार आहे. दुसरीकडे २०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला वर्षाला ४०.६० कोटी खर्च करावे लागणार आहे.सध्या भांडेवाडी येथील प्रक्रिया केलेले १३० एमएलडी सांडपाणी महाजनकोला दिले जाते. यातून महापालिकेला वर्षाला १५ कोटी मिळतात. मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पासोबत १५०एमएलडी पाण्याचा करार केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची क्षमता २०० एमएलडीवरून ३०० एमएलडी करण्याच्या प्रस्तावाला या आधीच मंजुरी दिली आहे.विशेष निधीतून एलपीजी शवदाहिनीमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी यांच्या पत्रानुसार महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या विशेष निधीतून सहकार नगर दहन घाटावर एलपीजी शवदाहिनी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ४२.७९ लाखांचा खर्च होणार आहे. शासनाच्या विशेष निधीतून हा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या ई-निविदा काढून शवदाहिनी खरेदी केली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर