शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून थक्क व्हाल
2
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
3
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
4
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
5
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
6
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
7
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
8
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
9
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
10
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी
11
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
12
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
13
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
14
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
15
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
16
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
17
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
18
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
19
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
20
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!

नागपूर महापालिका आर्थिक अडचणीत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:20 IST

नागपूर महापालिकेने जेव्हा २०० कोटी रुपयाच्या कर्जासाठी बँक आॅफ महाराष्ट्रकडे अर्ज केला तेव्हा बँकेने मनपाला त्यांचे रेटिंग मागितले. उत्पन्न, संपत्ती, रोख आणि नियमित उत्पन्नाचे माध्यम या आधारावर रेटिंग निश्चित केले जाते. केयर रेटिंग्स कंपनीच्या मदतीने मनपाने स्वत:चे रेटिंग करून घेतले. रोख व उत्पन्नाच्या माध्यमातून नागपूर महापालिका आर्थिक संकटात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ‘ए-निगेटिव्ह’ मार्किंग देण्यात आले. यासोबतच मनपाला २०० कोटीचे कर्जही मंजूर झाले.

ठळक मुद्देकेयर रेटिंगने दिले ए-निगेटिव्ह मार्किंग२०० कोटी रुपयाचे कर्ज मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेने जेव्हा २०० कोटी रुपयाच्या कर्जासाठी बँक आॅफ महाराष्ट्रकडे अर्ज केला तेव्हा बँकेने मनपाला त्यांचे रेटिंग मागितले. उत्पन्न, संपत्ती, रोख आणि नियमित उत्पन्नाचे माध्यम या आधारावर रेटिंग निश्चित केले जाते. केयर रेटिंग्स कंपनीच्या मदतीने मनपाने स्वत:चे रेटिंग करून घेतले. रोख व उत्पन्नाच्या माध्यमातून नागपूर महापालिका आर्थिक संकटात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ‘ए-निगेटिव्ह’ मार्किंग देण्यात आले. यासोबतच मनपाला २०० कोटीचे कर्जही मंजूर झाले.स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी पत्रकारांना सांगितले की, मनपाची आर्थिक परिस्थिती खराब नाही. हे रेटिंग्स निश्चित करणाऱ्या केयर कंपनीच्या रिपोर्टवरून स्पष्ट होते. कर्जासाठी बँक आॅफ महाराष्ट्रकडे अर्ज करण्यात आल्यावर रेटिंग मागण्यात आले. सुरुवातीला प्राथमिक स्तरावर मनपाचे रेटिंग ‘बी’ दिसून येत होते. परंतु दस्तावेजाची तपासणी केल्यानंतर ‘बी डबल प्लस’ची श्रेणी ेमिळण्याची शक्यता वाढली. जेव्हा पूर्ण दस्तावेजाची तपासणी केली तेव्हा मनपाला ‘ए- निगेटिव्ह’ रेटिंग देण्यात आले. हे रेटिंग चांगल्या कॉर्पोरेट घराण्यांनाही मिळत नाही. यामुळे मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे हे स्पष्ट होते. ए निगेटिव्ह रेटिंग मिळाल्याने आता कर्ज घेण्यासाठी एकाचवेळी रक्कम डिपॉझिट करून ठेवण्याची गरज पडणार नाही. त्यांच्यानुसार मोठ्या कंपन्यांनाही ‘ए प्लस’, ’ए डबल प्लस ’रेटिंग मिळत नाही.कंत्राटदारांना १५ दिवसात आणखी ५० कोटीकुकरेजा यांनी सांगितले की, कंत्राटदारांचे थकीत बिलाचे प्रकरण निपटले आहे. आता मोठ्या प्रकल्पांसाठी लोन घेण्यात आले आहे. कंत्राटदारांचे १५० कोटीचे बिल दिवाळीत क्लियर करण्यात आले. त्यानंतर १५ दिवसात १३५ कोटी देण्यात आले. आता येणाऱ्या १५ दिवसात आणखी ५० कोटी रुपये कंत्राटदारांना देण्यात येतील. आॅक्टोबरपर्यंतचे बिल देण्यात येईल. शेवटी २७ ते २८ कोटी रुपये थकीत राहतील. त्यांच्यानुसार शासकीय अनुदानातून करण्यात आलेल्या २१ कोटी रुपयाच्या कामापैकी ५.५० कोटी रुपयाचे बिल शिल्लक आहे. हुडकेश्वर-नरसाळा येथील कामांचे ६.३२ कोटीचे पूर्ण बिल देण्यात आले आहे. त्याचप्रकारे नोव्हेंबर २०१८ पर्यंत सिमेंट काँक्रिट रोडचे ३८.८० कोटी रुपयाचे बिल देण्यात आले आहे.आॅरेंज सिटी स्ट्रीटचे काम मेट्रो करेल, मनपा विकेलरेडिसन ब्ल्यू हॉटेलपासून सीआरपीएफ परिसरापर्यंत ३०.४९ हेक्टर जागेत आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रस्तावित आहे. सध्या हा प्रकल्प २५०० कोटीचा मानला जात आहे. या प्रकल्पात मनपा पैसे लावणार आहे. महामेट्रो या प्रकल्पाला विकसित करेल. मेट्रो मॉलसाठी नुकताच करार करण्यात आला आहे. उर्वरित प्रकल्प जसजसा पुढे जाईल तसतसा पूर्ण केला जाईल. एकूण प्रकल्पाची २.५ टक्के रक्कम मेट्रोला देण्यात येईल. कुकरेजा यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या ट्रॉन्झेक्शन अ‍ॅडव्हायजरचा खर्च खूप होता. त्यामुळे आता जुना प्रस्ताव रद्द करून सेल्स मॅनेजमेंट एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निविदा काढण्यात येतील. हाफिज कॉन्ट्रॅक्टर नवीन डिझाईन तयार करीत आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी