शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपूर मनपाकडे दमडी नाही; खैरात मात्र कोट्यवधींच्या प्रकल्पांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 10:44 IST

महापालिका आर्थिक संकटात आहे. कंत्राटदार व बस आॅपरेटर यांची थकबाकी ५०० कोटींच्या पुढे गेली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीचा अजब कारभार ५०० कोटींची थकबाकी, शेकडो कोटींची नवीन कामे

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आर्थिक संकटात आहे. कंत्राटदार व बस आॅपरेटर यांची थकबाकी ५०० कोटींच्या पुढे गेली आहे. अत्यावश्यक खर्च, ५०० कोटींच्या कर्जाचा हप्ता, केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांतील महापालिकेचा वाटा व दर महिन्याला तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता नवीन विकास कामांसाठी पैसा शिल्लक राहणे शक्यच नाही. थकबाकी द्यायला पैसा नसतानाही स्थायी समितीने मात्र कोट्यवधीच्या विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे.कंत्राटदारांना आठ महिन्यांपासून बिल मिळालेले नाही. पाच-दहा लाखांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आल्याने गेल्या दोन महिन्यापासून कंत्राटदारांचे आंदोलन सुरू आहे. महिनाभरापासून विकास कामे बंद आहेत. आपली बस आॅपरेटरची थकबाकी ६० कोटीवर गेली आहे. कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग व महागाई भत्त्याची थकबाकी ७० ते ८० कोटी आहे. हक्काचा पैसा मिळत नसल्याने कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत. कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत. वित्त विभागात सादर केलेल्या बिलाच्या फाईल्सचे ढिगारे लागले आहेत. प्रशासन हतबल झाले आहे. यावर तोडगा न काढता स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी नवीन कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. २०१८-१९ या वर्षात तिजोरीत २,९४६ कोटींचा महसूल जमा होईल, असे गृहित धरून कारभार सुरू आहे. प्रत्यक्ष उत्पन्नातून १२०० कोटींच्या आसपास महसूल जमा होणार असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. तिजोरीचा अंदाज न घेता समितीकडून नवीन कामांना मंजुरी देण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पैसा नसताना नवीन फाईल मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.स्थायी समितीत दर महिन्याला कोट्यवधींच्या कामांना मंजुरी दिली जाते. दोन दिवसापूर्वीच्या बैठकीत पुन्हा ८ ते १० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तिजोरीत पैसा नसताना मंजुरी देऊन निविदा काढण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक आर्थिक स्थिती चांगली असेल तर मंजुरी कधीही घेता येईल. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मंजुरीचा एक कलमी कार्यक्रम राबविला जात आहे.

आर्थिक स्थितीला स्थायी समितीच जबाबदारउत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता, नगर रचना, बाजार, स्थावर विभाग व जलप्रदाय विभागावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्थायी समितीची आहे. विभागांना दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी समितीची आहे. मात्र उत्पन्नात वाढ होण्यासाठी ठोस निर्णय न घेता काही विशिष्ट स्वरूपाच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे.याचा वसुलीवर परिणाम झाला आहे. महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीला स्थायी समितीच जबाबदार असल्याचा नगरसेवकांचा आक्षेप आहे.

१२५ कोटी मिळणार असल्याचा दावामहापालिकेने राज्य सरकारकडे ३२५ कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पहिल्या टप्प्यात यातील १२५ कोटी तातडीने मिळणार असल्याचा दावा स्थायी समितीकडून केला जात आहे. वास्तविक अशी चर्चा गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. नवीन कामांना मंजुरी देण्यावर आक्षेप येऊ नये यासाठी ही शक्कल लढविल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका