शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिका सापडली बिकट आर्थिक संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 13:58 IST

राज्य सरकारकडून अपेक्षित जीएसटी अनुदान मिळत नाही.आस्थापना खर्च व कर्जाच्या व्याजाचा हप्ता दर महिन्याला द्यावा लागत आहे. उत्पन्न व खर्चाचे नियोजन कोलमडल्याने नागपूर महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात अंदाज २२७२ कोटींचा सात महिन्यात ९४१ कोटी जमाविकास कामांना निधी नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता विभाग उत्पन्नात माघारला आहे. नगररचना विभागाचीही अशीच स्थिती आहे. त्यातच राज्य सरकारकडून अपेक्षित जीएसटी अनुदान मिळत नाही. जलप्रदाय विभागाचेही उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे आस्थापना खर्च व कर्जाच्या व्याजाचा हप्ता दर महिन्याला द्यावा लागत आहे. उत्पन्न व खर्चाचे नियोजन कोलमडल्याने महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.महापालिकेचा २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प २२७१.९७ कोटींचा सादर करण्यात आला होता. महापालिकेला शासनाकडून जीएसटी अनुदान स्वरुपात वर्षाला १०६३.५६ म्हणजेच दर महिन्याला ८८.६३ कोटींचे अनुदान गृहीत धरण्यात आले होेते. महापालिका प्रशासनानेही राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु प्रत्यक्षात दर महिन्याला जीएसटी अनुदान स्वरुपात ५१.५६ कोटी मिळत आहे. वर्षाला ही रक्कम ६१८.७२ कोटी इतकीच होते. अपेक्षित अनुदानाच्या ४४४.८४ कोटी कमी मिळणार आहे. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत ९४१. २८ कोटींचा महसूल जमा झाला. पुढील साडेचार महिन्यात २२७१.९७ कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता नाही.एलबीटी बंद झाल्याने मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. त्यात घरांच्या सर्वेचा घोळ निर्माण झाला आहे. डिसेंबरपूर्वी शहरातील घरांचा सर्वे होण्याची शक्यता नाही.करण्यात आलेल्या सर्वेवर नगरसेवक व नागरिकांनी  आक्षेप नोंदविले आहेत. याचा परिणाम मालमत्ता कराच्या वसुलीवर होणार आहे. नगररचना विभागाचीही अशीच परिस्थिती आहे. शासनाकडून मागणीनुसार अनुदान मिळण्याची शक्यता नाही.उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीजुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला. स्थानिक संस्था कर (एलबीटी) संपुष्टात आला आहे. अर्थसंकल्पात १०६५ कोटींचे जीएसटी अनुदान गृहीत धरण्यात आले होेते. मात्र ६१८.७२ कोटीचे अनुदान मिळणार आहे. उत्पन्नवाढीसाठी थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली. यात दंडाची रक्कम माफ केल्यानंतरही मालमत्ता व पाणीपट्टीची १० टक्केच थकबाकी वसूल झाली.

टॅग्स :nagpurनागपूर