शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेने तीन महिन्यात केला ८५ कोटींचा कर वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:54 IST

मनपाची २५ टक्के उद्दिष्टपूर्ती : सवलतीचा १ लाख ८५ हजार मालमत्ताधारकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कराचा भरणा साधारणतः वर्षअखेरीस मोठ्या प्रमाणात केला जातो. पण महापालिकेने मालमत्ता करात दिलेल्या सवलतीमुळे पहिल्याच तिमाहीत टार्गेटच्या २५ टक्के करवसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत महापालिकेने ८५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाला ३५० कोटींचे टार्गेट देण्यात आले होते.

महापालिकेने नवीन आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केल्यास मालमत्ता धारकांस सवलत दिली होती. यामध्ये ऑनलाइन कराचा भरणा केल्यास १५ टक्के व ऑफलाइन कराचा भरणा केल्यास १० टक्के सवलत देण्यात येत होती. याचा १ लाख ८५ हजार ३७९ मालमत्ता धारकांनी फायदा घेतला. महापालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत मालमत्ता कर आहे. 

गेल्या दोन वर्षापासून महापालिका कराची वसुली करण्यासाठी अभय योजना राबवून सवलत उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे विभाग दिलेल्या टार्गेटच्या जवळपास पोहचत आहे. गेल्यावर्षीही १० आणि १५ टक्क्यांची सवलत दिली होती. त्यामुळे गेल्यावर्षी पहिल्या तिमाहीत ५४ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला होता. यंदा ८५ कोटींपर्यंत ही रक्कम पोहचली आहे.

सात कोटींची सवलतऑनलाइनमध्ये १५ टक्के व ऑफलाइनमध्ये १० टक्के सवलत देण्यात आली होती. ९१,२८१ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन कर भरून ५ कोटी ३६ लाख ९९ हजार ४६ रुपये सवलत मिळविली. तर ९१,७३९ मालमत्ता धारकांनी १ एप्रिल ते ३० जून दरम्यान महापालिकेच्या कार्यालयात जाऊन मालमत्ता कर भरून १ कोटी ९९ लाख ६३ हजार ४८२ रुपयांची सवलत मिळविली.

अंतिम दिनी सायंकाळी ७ पर्यंत ३ कोटी २२ लाखांची वसुली

  • महापालिकेने मालमत्ता कराचा १ भरणा करून सवलतीचा लाभघ्यावा म्हणून शोले सिनेमातील गब्बर सिंगचा आधार घेतला होता. त्याचबरोबर वस्त्यावस्त्यांमध्ये फिरत्या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती केली होती.
  • त्यामुळे अखेरच्या दिवशी मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांचा प्रचंड ओघ दिसून आला. विशेष म्हणजे महापालिकेने इतिहासात पहिल्यांदा ३० जूनला रात्री बारापर्यंत मालमत्ता कराचा स्वीकार करण्यासाठी कार्यालय सुरू ठेवले होते.
  • विभागाकडून मिळालेल्या 3 माहितीनुसार, अखेरच्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ३ कोटी २२ लाख रुपये मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला होता.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सnagpurनागपूर