शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

नागपूर मनपात भाजपाला धक्का; घडले ‘परिवर्तन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 9:28 PM

राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला होता. मात्र जोडतोडीचे प्रयत्न करूनही भाजपा समर्थित अपना पॅनलला जबर धक्का देत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनल विजयी झाले आहे.

ठळक मुद्देईश्वर चिठ्ठीतही सत्तापक्षाला दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला होता. मात्र जोडतोडीचे प्रयत्न करूनही भाजपा समर्थित अपना पॅनलला जबर धक्का देत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनल विजयी झाले आहे. ७५ सदस्यांपैकी अपना पॅनलचे ३३ तर परिवर्तन पॅनलचे ४२ सदस्य निवडून आले आहेत.विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षापासून संघटनेचे अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. पण कार्याध्यक्ष राजेश हातीबेड हेच कामकाज बघत होते. अपना पॅनलचा पराभव झाल्याने आता अध्यक्षपदावरून फडणवीस यांचे नाव हटणार आहे. परिवर्तन पॅनलने सुरेंद्र टिंगणे यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.१० मार्चला कर्मचारी संघटनेच्या ५२ जागांपैकी ४२ जागांसाठी मतदान झाले. यात १७०० मतदारांनी मतदान केले. अपना पॅनलला १६जागा तर परिवर्तन पॅनलला २५ जागा मिळाल्या. उर्वरित ११ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यात अपना पॅनलला ९ तर परिवर्तन पॅनलला २ जागा मिळाल्या होत्या. अशा प्रकारे अपना पॅनलच्या २५ तर परिवर्तनच्या २७ जागा निवडून आल्या. मात्र दोन सदस्य अपना पॅनलच्या गोटात गेल्याने परिवर्तनची चिंता वाढली होती. यातील एक सदस्य परत आला. त्यानंतर कार्यकारी मंडळाच्या १८ जागांसाठी निवडून आलेल्या सदस्यांनी मतदान केले. दोन्ही पॅनलच्या प्रत्येकी २ उमेदवारांना २७ मते मिळाली तर उर्वरित १६ जणांना प्रत्येकी २५ मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने कौल घेण्यात आला. यात अपना पॅनलला ५ तर परिवर्तनला ९ जागा मिळाल्या. अशा प्रकारे अपना पॅनलला ७ तर परिवर्तन पॅनलला ११ जागा मिळाल्या. तर पाच स्वीकृत सदस्य परिवर्तन पॅनलचे निवडून आले. त्यामुळे एकूण ७५ सदस्यांपैकी ३३ सदस्य अपना पॅनलचे तर ४२ सदस्य परिवर्तन पॅनलचे निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता असताना व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या कर्मचारी संघटनेला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.असे आहेत नवनिर्वाचित सदस्यपरिवर्तन पॅनल : रंजन नलोडे, दिलीप निखाडे, नारायण वानखेडे, मारोती नासरे, मंजुश्री कान्हेरे, मिलिंद चकोले, बळवंत गजबे, भीमराव लांडगे, बळीराम शेंडे, राजू नन्नावरे, सुनील दातार, सत्यवान मेश्राम, योगेश नागे, विलास येवले, गौतम गेडाम, बाबा श्रीखंडे, योगेश बोरकर, शीतल जांभूळकर, संजय मोहले, देवानंद वाघमारे, संजय शिंगणे, विलास चहांदे, एस.पी. मौंदेकर, सीमा मेश्राम, मंगेश देशपांडे, प्रतिनिधींच्या जागांवर पुरुषोत्तम कैकाडे, संजय गाटकिने, विजय लुटे, मेहराज शिंदेकर, मोहन टाकभवरे, विश्वास सेलसूकर, पुष्पा शर्मा, मनोहर महाकाळकर, सय्यद मुजहर अली, प्रफुल टिंगणे व प्रेमचंद अडकिने आदींचा समावेश आहे. स्वीकृत सदस्यांत सुरेंद्र टिंगणे, सुदाम महाजन, ईश्वर मेश्राम, प्रवीण तंत्रपाळे, राजपाल खोब्रागडे आदींचा समावेश आहे.अपना पॅनल : श्रीकांत वैद्य, अमोल तपासे, गणराज महाडिक, शंकर हजारे, प्रशांत डुडुरे, सुरेंद्र दुधे, राजू लोणारे, किशोर तिडके, राजेश कछवाह, राजेश हाथीबेड, शिवकुमार नायडू, गजानन जाधव, विनय पाटील, सतीश सोलंकी, संजय बागडे, विशाल शेवारे, प्रदीप खोब्रागडे, गणेश मिराशे, राजेंद्र पाटील, अमोल चोरपगार, उमेश भदाळे, झडू मोहाडीकर, आशिष तालेवार, नितीन वैद्य, गणेश मेसरे, लीलाधर पाटील, नंदू पेकडे, सहयोगी सदस्यांत काजी फिरोज, वंदना म्हैसकर, अभय बुराडे, मीना नकवाल, अनिल निभोंजकर, सुनील मेश्राम व विशाल ढोणे आदींचा समावेश आहे.आता न्यायासाठी संघर्षाची भूमिकागेल्या तीन वर्षांत कर्मचाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नसल्याने शिक्षक संघाने परिवर्तन पॅनलच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली. विविध संघटना एकत्र आल्या. आता कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटना सर्वांना विश्वासात घेऊन आंदोलनाचा निर्णय घेईल.राजेश गवरे, अध्यक्ष मनपा शिक्षक संघ

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक