शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनपा आयुक्त राबविणार पट्टेवाटपाची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:47 IST

झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाला शनिवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देसभागृहाने दिले अधिकार : ‘सोशल इकॉनॉमिक सर्वे’नंतर वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाला शनिवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.नागपूर शहरात महापालिका, नासुप्र, महसूल तसेच खासगी जागांवर झोपडपट्ट्या आहेत. खासगी जागांवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यासाठी जागा मालकांना टीडीआर देण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात यावे. झोपडपट्टीधारकांना त्याच जागेवर वसविण्यात यावे, अशी सूचना भाजपाचे नगरसेवक अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केली. बाल्या बोरकर यांनी मेहतरपुरा व सुदर्शननगर येथील समाजभवनावरील कब्जा सुदर्शननगरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. शासनाने झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचा निर्णय घेतला असतानाही सेवाशुल्क कसे आकारले जात आहे, असा प्रश्न प्रफुल्ल गुडधे यांनी उपस्थित केला.झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया ‘सोशल इकॉनॉमिक सर्वे’ झाल्यानंतरच राबविली जाणार आहे. मात्र पट्टेवाटप करताना झोपडपट्टीधारकांना शुल्क द्यावे लागणार आहे. नागपूर शहरात ४४६ झोपडपट्ट्या आहेत़ यातील न्यू फुटाळा वस्ती-१, न्यू फुटाळा वस्ती, ठक्करग्राम-१, ठक्करग्राम-२, भुतेश्वर कॉलनी, नंदाजीनगर, शिवाजीनगरातील गोंडपुरा, चिमाबाई झोपडपट्टीसाठी पट्टे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित रामबाग, बोरकरनगरातील बसोड मोहल्ला, गुजरनगर, मेहतरपुरा, सुदर्शननगर, तकीया धंतोली, तकीया धंतोलीतील सरस्वतीनगर, झोपडपट्टीतील नागरिकांना पट्टे वाटप शिल्लक आहे. झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप करताना येथील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांना शुल्क न आकारता पट्टे वाटप करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. रामबाग, तकीया धंतोलीतील झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप करण्यासंदर्भातील अधिकार महापालिकेला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या झोपडपट्टी विभागाने तयार केला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पट्टेवाटपाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.गृहनिर्माण संस्था करणे बंधनकारकझोपडपट्टीधारकांनी गृहनिर्माण संस्था तयार करणे बंधनकारक असणार आहे़ एकत्रित भाडेपट्टा या संस्थेच्या नावावर करण्यात येईल़ पट्टेवाटप लाभार्थी झोपडपट्टीधारकांना या संस्थेचे सदस्य होणे बंधनकारक राहणार असेल. मुद्रांक शुल्क तसेच नोंदणी शुल्क लागेल़ शासकीय नोंदीनुसार शहरात ४४६ झोपडपट्ट्या आहेत. यातील २८८ झोपडपट्ट्या अधिकृत आहेत़ नझुल, नासुप्र व महापालिकेच्या जागांवर या झोपडपट्ट्या आहेत़ यातील १५ झोपडपट्ट्या महापालिकेच्या जागेवर आहेत़.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHomeघर