शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नागपूर मनपा आयुक्त रजेवर, सभा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:02 IST

कौटुंबिक कारणामुळे आयुक्त वीरेंद्र सिंह अचानक १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आयुक्तांशी संबंधित आहेत. तसेच नवीन दोन अपर आयुक्तांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सभा स्थगित करण्यात यावी. अशी मागणी सत्तापक्ष नेते व विरोधी पक्षनेते यांनी महापौरांना दिलेल्या पत्रातून केली. त्यानुसार महापौर नंदा जिचकार यांनी सभा स्थगित करून २४ सप्टेंबरला सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला. तसेच या सभेला आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देसत्ताधारी व विरोधकांची अनुपस्थितीवर नाराजी : महापौरांना लिहिले पत्र: २४ सप्टेंबरला होणार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक कारणामुळे आयुक्त वीरेंद्र सिंह अचानक १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आयुक्तांशी संबंधित आहेत. तसेच नवीन दोन अपर आयुक्तांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सभा स्थगित करण्यात यावी. अशी मागणी सत्तापक्ष नेते व विरोधी पक्षनेते यांनी महापौरांना दिलेल्या पत्रातून केली. त्यानुसार महापौर नंदा जिचकार यांनी सभा स्थगित करून २४ सप्टेंबरला सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला. तसेच या सभेला आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.आजवर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आयुक्त उपस्थित नसल्यास सभा रद्द करण्याचे प्रकार अनेकदा घडले. परंतु सभागृहाच्या एक दिवसाआधी सभा स्थगित करण्याचा प्रकार प्रथमच घडला. आयुक्तांच्या कार्यप्रणालीमुळे सत्ताधारी नाराज आहेत. विरोधकांनी तर बिकट आर्थिक स्थितीच्या मुद्यावरून महापालिका बरखास्त करण्याबाबतचा प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. आयुक्त नसल्याने सभा स्थगित करण्यासंदर्भात सत्तापक्षनेते संदीप जोशी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील बहुतांश विषय आयुक्तांशी संबंधित आहेत. त्यातच अपर आयुक्त व उपायुक्त नवीन आलेले आहेत. त्यामुळे आयुक्त उपस्थित असणे गरजेचे असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. आयुक्त १५ दिवसांच्या रजेवर आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रानंतर २४ सप्टेंबरला सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.महापालिकेची आर्थिक परिस्थिती या आधीही चांगली नव्हती. परंतु कामकाज सुरू होते. आता मूलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध होत नाही. हे समजण्यापलीकडील आहे. के्रडाईचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. त्यांनीही आयुक्तांच्या व्यवहारावर नाराजी व्यक्त केली. एकंदरीत आयुक्तांचे वागणे शहरातील जनतेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यांची तक्रार मुख्यमंत्र्याकडे केलेली नाही. परंतु आयुक्तांनी जनतेचे हित विचारात घेता महापालिकेच्या कामकाजाची पद्धती जाणून घेण्याची गरज असल्याचे जोशी म्हणाले.स्थायी समितीची परवानगी घेतली नाहीआयुक्तांना रजेवर जावयाचे असल्यास महापालिका कायद्यानुसारर स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागते. मंजुरीनंतरच त्यांनी रजेवर जाणे अपेक्षित आहे. परंतु आयुक्तांनी सोमवारी स्थायी समितीला विनंती पत्र पाठविले. मात्र पत्रात खालच्या बाजूला माहितीस्तव म्हटले आहे. यावरून आयुक्तांनी समितीची परवानगी घेतलेली नाही. फक्त सूचना दिली आहे.१६ लाखांची कार का खरेदी केलीमहापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. गडर लाईन,चेंबर अशा फाईल मंजूर होत नाही. मग आयुक्तांनी १६ लाखांची नवीन कार खरेदी कशी केली. ही कार स्मार्ट प्रकल्पातून घेतल्याची चर्चा आहे. पण पैसे तर महापालिकेचेच आहेत. स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, कर सभापती संदीप जाधव टॅक्स वसुलीसाठी बैठका घेत आहेत. मात्र आयुक्तांनी टॅक्स वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही. त्यातच त्यांनी निविदा समिती गठित केली. यामागील कारण समजले नाही, असेही जोशी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त