शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

नागपुरात  मोटार अपघात दावा ३३ लाखांत निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:24 IST

राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयातील पॅनलने पाच वर्षे जुना मोटार अपघात दावा ३३ लाख रुपये भरपाईवर तडजोड पक्की करून निकाली काढला.

ठळक मुद्देराष्ट्रीय लोक न्यायालय : एकूण ११ हजारावर प्रकरणे संपली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयातील पॅनलने पाच वर्षे जुना मोटार अपघात दावा ३३ लाख रुपये भरपाईवर तडजोड पक्की करून निकाली काढला.लोक न्यायालयात दिवाणी व मोटार अपघात दावे, फौजदारी व कौटुंबिक प्रकरणे, धनादेश अवमानना प्रकरणे यासह विविध प्रकारची एकूण ३४ हजार ४४६ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११ हजार ३८० प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. पॅनलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. मनीष पितळे, सेवानिवृत्त न्यायमूर्ती डी. एस. झोटिंग यांच्यासह इतरांचा समावेश होता. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या. व्ही. पी. गायकवाड, सचिव न्या. कुणाल जाधव आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.तृतीयपंथी विद्या कांबळेंचे पॅनलएका पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा विधी स्वयंसेवक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. मुरकुटे पॅनल प्रमुख तर, अ‍ॅड. रोहिणी देशपांडे वकील सदस्य होत्या. या पॅनलने दोन मोटार अपघात दावे २८ लाख ५० हजार व १९ लाख रुपयांत तडजोड करून निकाली काढले.अलंकार सिनेमागृहाचा वाद मिटलालोक न्यायालयात अलंकार सिनेमागृहाच्या मालकीहक्काचा वाद तडजोडीने मिटला. दावेदार प्रियंका महेशकर यांना ६० टक्के तर, प्रतिवादी पाच वारसदारांना ४० टक्के मालकीहक्क देण्यात आला. सिनेमागृहाच्या पूर्ण मालकीहक्कासाठी प्रियंका यांनी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. प्रियंका यांनी स्वत: तर, प्रतिवादींतर्फे अ‍ॅड. अंकुर कपले यांनी बाजू मांडली.ताजुद्दीन ट्रस्ट व खादिमांत तडजोडहजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट व खुदाम दर्गा कमिटीमधील चिरागी व अन्य वाद लोक न्यायालयामध्ये तडजोडीने संपविण्यात आले. याप्रकरणात २० अटी निर्धारित करण्यात आल्या. त्यानुसार, ताजुद्दीन बाबा दरबारात चार ते सहा खादीम गणवेशात सेवा प्रदान करतील. त्यांना भाविकांकडून बळजबरीने चिरागी किंवा नजराणा घेता येणार नाही. अटींचे उल्लंघन करणाऱ्या खादिमांवर कारवाई केली जाईल. तडजोडीसाठी ट्रस्टचे प्रशासक गुणवंत कुबडे व कमिटीचे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :National Lok Dalराष्ट्रीय लोकदलnagpurनागपूर