शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

नागपूर पावसाळी अधिवेशन; आरोग्य सेवेत १७० डॉक्टरांसह कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:18 PM

नागपूर येथे होत असलेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी अस्थायी दवाखाना उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सापावरील ‘अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम’ सोबतच कुत्रा चावल्यानंतर दिली जाणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध असणार आहे.

ठळक मुद्दे‘अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम’ही उपलब्ध असणार फिरत्या रुग्णालयांसह २० रुग्णवाहिका तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर येथे होत असलेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी अस्थायी दवाखाना उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पावसाचे दिवस लक्षात घेऊन सापावरील ‘अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम’ सोबतच कुत्रा चावल्यानंतर दिली जाणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध असणार आहे. या अधिवेशनात तीन अस्थायी व तीन फिरत्या दवाखान्यातून मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागाचे १७० डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी आरोग्य सेवा देणार आहे.अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी विशेष सोय केली जाते. आतापर्यंत हिवाळी अधिवेशन होत असल्याने थंडीच्या वातावरणाला घेऊन त्या दृष्टीने औषधोपचार उपलब्ध करून दिला जायचा, परंतु यावर्षी पावसाळा असल्याने डेंग्यू, मलेरिया, व्हायरल, सर्दी, खोकल्यांवरील औषधांसह साप व श्वान दंशावरील लसही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. औषधांचा हा साठा विशेष मंजुरीनंतर मेयो रुग्णालय खरेदी करणार आहे.अधिवेशन दरम्यान रविभवन, आमदार निवास व विधान भवनात अस्थायी दवाखाना सुरू केला जाणार आहे.शिवाय, यशवंत स्टेडियम येथील धरणे मंडप, सहा मोर्चाची ठिकाणे व १६० गाळे परिसरात सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग व फिरता दवाखाना असणार आहे. पावसाचे दिवस व आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार मेयो, मेडिकल व आरोग्य विभागाचे १४ फिजिशियन, ४८ वैद्यकीय अधिकारी, ३५ ब्रदर्स व परिचारीका, १७ फार्मसिस्ट, १८ तंत्रज्ञ, सहा इसीजी तंत्रज्ञ व ३२ कर्मचारी आरोग्य सेवेत असणार आहेत. या अधिवेशनात २० रुग्णवाहिका तैनात केली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८