शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रोजगाराचे आमिष दाखवून रक्कम हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:51 IST

रोजगाराच्या शोधात असलेल्या एका तरुणाला रोजगाराचे आमिष दाखवून एका महिलेने त्याच्याकडून २० हजार रुपये लंपास केले. २४ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२० या दरम्यान ही घटना घडली.

ठळक मुद्देतरुणाची फसवणूक : आरोपी महिलेवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोजगाराच्या शोधात असलेल्या एका तरुणाला रोजगाराचे आमिष दाखवून एका महिलेने त्याच्याकडून २० हजार रुपये लंपास केले. २४ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२० या दरम्यान ही घटना घडली. अरविंदकुमार व्यास शर्मा ( वय २२) असे पीडित तरुणाचे नाव असून तो एमआयडीसीतील प्रियदर्शिनी होस्टेल नंबर ४ मध्ये राहतो. शर्मा रोजगाराच्या शोधात ऑनलाईन सर्चिंग करत असताना त्याच्या मोबाईलवर २४ डिसेंबर २०१९ ला फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या महिलेने आपले नाव अदिती अशोक प्रतापसिंग शर्मा सांगितले. तुम्ही, आम्ही सांगितलेले फॉर्म भरून द्या. पंधरा दिवसात १ हजार फॉर्म भरून दिले तर प्रत्येकी १२ रुपये ५० पैसे एका फॉर्मप्रमाणे तुम्हाला १२ हजार ५०० रुपये मानधन मिळेल, असे त्या महिलेने सांगितले होते. तिने सांगितल्याप्रमाणे शर्माने १५ दिवसात ४४८ फॉर्म भरले. त्याचे मानधन मिळावे म्हणून तो अदिती हिच्यासोबत फोनवरून संपर्कात होता. आधी तिने त्याला एनओसी चार्जेस, जीएसटी चार्जेस, फाईल अपडेट चार्जेसच्या नावाखाली एकूण १९ हजार ९८० रुपये मोबाईल फोन पे अ‍ॅप द्वारे जमा करण्यास सांगितले. ती रक्कम लंपास करून स्वत:चा फोन बंद केला. तिने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे शर्माने एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. हे प्रकरण तपासासाठी सायबर सेलकडे गेले. त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कथित अदिती शर्माचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी