शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पॉलिसीचे आमिष दाखवून रक्कम लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:59 IST

एलआयसी प्लॅनमध्ये रक्कम गुंतवायची आहे असे आमिष दाखवून एका तरुणीने एलआयसी एजंटला सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलवले आणि तिच्या साथीदारांनी त्याला मारहाण करून त्याचे २० हजार रुपये लुटून नेले.

ठळक मुद्देएलआयसी एजंटची तक्रार : सोनेगावमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एलआयसी प्लॅनमध्ये रक्कम गुंतवायची आहे असे आमिष दाखवून एका तरुणीने एलआयसी एजंटला सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलवले आणि तिच्या साथीदारांनी त्याला मारहाण करून त्याचे २० हजार रुपये लुटून नेले. सोमलवाडा चौकाजवळ गुरुवारी दुपारी १.४५ च्या सुमारास ही घटना घडली. सुजय श्रीपाद गोडसे (वय ३९) असे तक्रार करणाऱ्याचे नाव आहे. ते सिव्हिल लाईन्समधील फॉरेस्ट सोसायटीत राहतात. गोडसे एलआयसी एजंट आहेत. त्यांना रिया नामक तरुणीचा फोन आला. तुमच्याकडे काही चांगले इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत का, अशी तिने विचारणा केली. गोडसेने तिला एलआयसीतील वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या योजना सांगितल्या. त्यातील एका योजनेत रक्कम गुंतवायची आहे, असे सांगून कथित रियाने गोडसे यांना गुरुवारी दुपारी सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्वेनगरात बोलविले. गोडसे तेथे पोहोचले. रिया आलीच नाही मात्र तिचे तीन साथीदार तिथे पोहोचले. त्यांनी गोडसेला मारहाण करून आपल्या दुचाकीवर बसविले आणि सोमलवाडा चौकाजवळच्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये घेऊन गेले. तेथे गोडसेंना त्यांच्या एटीएम कार्डमधून जबरदस्तीने २० हजार रुपये काढायला लावले. ती रक्कम घेऊन धमकी देत आरोपी पळून गेले. गोडसे यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी जबरी चोरी आणि मारहाण करून धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहेआरडाओरड का केली नाही!भरदुपारी वर्दळीच्या भागात ही घटना घडली. त्यामुळे गोडसे यांनी मदतीसाठी आरडाओरड का केली नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या घटनेमागे दुसरे काही कारण आहे का, पोलीस त्याचीही चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी