शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

Nagpur: मोखाबर्डी उपसा सिंचन योजना : कालव्याचे पाणी शेतात, हरभऱ्याचे नुकसान

By जितेंद्र ढवळे | Updated: November 21, 2023 19:14 IST

Nagpur News: मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटल्यामुळे गोंडबोरी येथील शेतकऱ्याच्या दिड एकर शेतातील हरभरा पाण्याखाली आला आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना त्यात मोखाबर्डी योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा त्यांच्या जीवावर उठला आहे.

नागपूर (भिवापूर) - मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटल्यामुळे गोंडबोरी येथील शेतकऱ्याच्या दिड एकर शेतातील हरभरा पाण्याखाली आला आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना त्यात मोखाबर्डी योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा त्यांच्या जीवावर उठला आहे. ठिकठीकाणी कालव्याचे पाणी असे शेतात शिरत असल्यामुळे योजनेच्या कामावर व अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह लागले आहे.

नरहरी यादवराव माळवे रा. गोंडबोरी यांची धापर्ला शिवारात अंदाजे १६ एकर शेती आहे. यात त्यांनी हरभऱ्यासह इतर पिकांची लागवड केली आहे. मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास अचानक योजनेच्या कालव्याची पाळ फुटल्यामुळे पाणी शेतात शिरले. काही कळण्यापूर्वीच दिड एकरात अंकुरलेला हरभरा पाण्याखाली आल्याने माळवे यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्याने मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर अधिकारी मोक्कास्थळी पोहचले. यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले. शेतात साचलेले पाणी नदीपात्रात वळते करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्याला सांगितले. मात्र झालेल्या नुकसानीचे काय? यावर मात्र सबंधित विभागाने नेहमी प्रमाणे मौन धारण केलेले आहे. यापूर्वी सुध्दा रोहना, वडध, मोखाळा परिसरात कुठे कालवा तर कुठे कालव्याची नाली फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही कुठले काही योग्य पाऊल उचलतांना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यात मोखाबर्डी योजनेच्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त होत आहे.

कारण तरी काय?गोसेखूर्द प्रकल्पावर आधारीत महत्वाकांक्षी मोखाबर्डी सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. असे असतांना योजनेअंतर्गत कालवे अशाप्रकारे अल्पावधीत फुटत असेल, तर कोट्यवधी रूपये खर्चुन निर्माण करण्यात आलेल्या योजनेचे फलीत तरी काय? हा प्रश्नच आहे. कालवा फुटण्याचे कारण काय? याबाबत विचारणा केल्यानंतर सारवासारव करण्यापलीकडे अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर सबंधीत अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाठविले. शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.- प्रशांत गोडे, कार्यकारी अभियंताआंभोरा उपसा सिंचन विभाग, भिवापूर

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर