लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिलाबाबत गुरुवारी सकाळी नागपुरात निषेध मोर्चा काढला. वाढीव बिल माफ करा अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी, मनसे शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष अतुल वंदिले यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी जनतेच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. हा मोर्चा संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.यापूवीर्ही मनसेच्या वतीने या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले आहे, बिजली नगर विश्रामगृह येथेतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे समोर सरचिटणीस हेमंत गडकरी व हे अनेक पदाधिकाऱ्यांसोबत काळे कपडे परिधान करून गेले होते व या विषयावर ना.राऊत व मनसे पदाधिकारी यांची बाचाबाची सुद्धा झाली होती.
नागपुरात वाढीव वीज बिलाविरोधात मनसेने काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 13:02 IST