शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रोचा महावितरणला ताप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:17 IST

नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पूर्वसूचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा फटका महावितरणसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून अंधार आणि उकाड्यामुळे वीजग्राहक मेटाकुटीस आले आहेत.

ठळक मुद्देखोदकामामुळे तुटताहेत भूमिगत वीजवाहिन्या : ग्राहकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पूर्वसूचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा फटका महावितरणसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून अंधार आणि उकाड्यामुळे वीजग्राहक मेटाकुटीस आले आहेत.गुरुवारी रात्री भारतीय खाद्य निगम परिसरास वीज पुरवठा करण्याऱ्या भूमिगत वाहिनीला अजनी चौक येथे मेट्रो आणि ओसीडब्ल्यूच्या खोदकामांचे वेळी तडा बसल्याने सुमारे अडीच हजार ग्राहकांचा वीज पुरवठा रात्री ८ वाजता खंडित झाला. रात्रीची वेळ असल्याने बिघाड दुरुस्त करणे शक्य नसल्याने पर्यायी मार्गाने वीज पुरवठा घेऊन ग्राहकांना त्वरित दिलासा देण्यात आला होता, या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी पहाटे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात येऊन सकाळी १० वाजेपर्यंत येथील वीज पुरवठा नियमित वाहिनीवर स्थानांतरित करण्यात आला.याशिवाय शुक्रवारी मुंजे चौकात पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास परत एकदा मेट्रोच्या खोदकामाचा फटका महावितरणच्या भूमिगत वीज वाहिनीला बसला. बिघाडाची माहिती मिळताच बर्डी शाखा कार्यालयाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि पहाटेच तेथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.काँग्रेसनगर विभागात बहुतांश वीज यंत्रणा भूमिगतमहावितरणच्या काँग्रेसनगर विभागात महावितरणची बहुतांश वीज वितरण यंत्रणा ही भूमिगत आहे, या यंत्रणेचा नकाशाही महावितरणकडे उपलब्ध आहे, यामुळे खोदकाम करतेवेळी महावितरणला पूर्वसूचना दिल्यास वीज वितरण यंत्रणेचे संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे. अशा खोदकामांमुळे महावितरणच्या भूमिगत उच्चदाब वाहिनीचे नुकसान झाल्यास वीजपुरवठा सुरळीत करणे क्लेशदायक असते, व त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसतो. यामुळे ग्राहकांमध्ये महावितरणविरोधात रोषही निर्माण होतो, हे सर्व टाळण्यासाठी विकास कार्याकरिता खोदकाम करणाºया प्रत्येक संस्थेने एकमेकांशी समन्वय साधल्यास त्याचा कुणाला त्रास होणार नाही, किंबहुना संबंधित कामही सहजतेने होईल.

टॅग्स :Metroमेट्रोmahavitaranमहावितरण