शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार नागपूर मेट्रो ‘एअरपोर्ट स्टेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:44 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारे चौथे एअरपोर्ट स्टेशन अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार आहे. स्टेशनचे कॉनकोर्स तयार असून प्लॅटफॉर्मच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमहामेट्रो : प्लॅटफॉर्म बांधकामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारे चौथे एअरपोर्ट स्टेशन अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार आहे. स्टेशनचे कॉनकोर्स तयार असून प्लॅटफॉर्मच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.महामेट्रोच्या चौथ्या स्टेशनची निर्मितीनागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाअंतर्गत एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या पिलरवरील ट्रॅकचे बुलंदद्वारे यशस्वी परीक्षण करण्यात आले. यानंतर आता या मार्गावरील स्टेशनचे बांधकामदेखील वेगाने पूर्ण केले जात आहे. खापरी, न्यू-एअरपोर्ट आणि एअरपोर्ट साऊथ या तीन मेट्रो स्टेशननंतर आता हे चौथे मेट्रो स्टेशन तयार होत आहे. लवकरच स्टेशनचे बांधकाम पूर्ण होईल आणि खापरी ते एअरपोर्टपर्यंत ६.५ कि.मी.चा ट्रॅक तयार असेल. एअरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या कार्याचा आढावा घेतला असता याठिकाणी स्टेशनचे प्रारंभिक बांधकाम पूर्णपणे तयार झाले असून इतर कार्यदेखील निर्माणाधीन आहेत.सामान्य आणि दिव्यांगांसाठी सुविधापर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक वाटेल, अशा उद्देशाने हे स्टेशन बनविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर अंदाजे ५०० मीटर अंतरावर वर्धा महामार्गाच्या मध्यभागी पिलरवर हे आधुनिक स्टेशन तयार होत आहे. एअरपोर्ट स्टेशन हे अर्बन आर्किटेक्ट थीमवर आधारित आहे. संपूर्ण स्टेशन एकूण २२ पिलरवर उभे राहणार आहे. २२३० वर्गमीटर इतक्या जागेवर एअरपोर्ट स्टेशन उभारण्यात येत आहे. स्टेशनची लांबी ८१ मीटर आणि रुंदी २६ मीटर आहे. व्हायाडक्ट एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरील कॉनकोर्स तयार झाले आहे. याठिकाणी स्टेशन कंट्रोल रूम, तिकिट काऊंटर, शौचालयागृह व इतर संबंधित केंद्र तयार केले जात आहे. तसेच कॉनकोर्सवरील प्लॅटफॉर्म बनविण्याचे कार्य सुरू आहे. याशिवाय प्रवाशांच्या सेवेसाठी पार्किंगची व्यवस्था स्टेशन परिसरात केली जाणार आहे. इतर मेट्रो स्टेशनप्रमाणे या स्टेशनवरदेखील दिव्यांग, नेत्रहीन, महिलांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय स्टेशनलगतची महा मेट्रोची एन्सिलरी इमारतदेखील तयार होत आहे. ही इमारत व्यावसायिक हेतूने वापरण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोAirportविमानतळ