शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचा पारा ४१ अंशावर; चंद्रपूर सर्वाधिक @ ४३.२ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2023 19:28 IST

Nagpur News एप्रिलचे ऊन चंद्रपूरकरांसाठी सर्वाधिक तापदायक ठरले असून येथे पारा ४३.२ अंशावर गेला आहे, जाे राज्यात सर्वाधिक आहे.

नागपूर : काहीसे ढगाळ वातावरण असले तरी तापमान वाढीचे सत्र मात्र कायम आहे. शुक्रवारी नागपूरचा पारा ४१ अंशावर पाेहोचला. ढगांमुळे उन्हाचे चटके जाणवत नसले तरी उकाडा मात्र त्रासदायक ठरत आहे. दरम्यान एप्रिलचे ऊन चंद्रपूरकरांसाठी सर्वाधिक तापदायक ठरले असून येथे पारा ४३.२ अंशावर गेला आहे, जाे राज्यात सर्वाधिक आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, सध्या विदर्भात ढगाळ वातावरण आहे; पण अवकाळी पाऊस किंवा विजांची नाेंद कुठे झाली नाही. ढगांची स्थिती असली तरी सूर्याचा ताप मात्र वाढत चालला आहे. विदर्भात सर्वात कमी बुलढाणा ३५ अंश व गडचिराेली ३८ अंश वगळता इतर सर्व जिल्ह्यात दिवसाचा पारा ४० पार गेला आहे. चंद्रपूर, ब्रम्हपुरीनंतर वर्धा ४२.२ अंश, अमरावती ४१ अंश तर अकाेला, गाेंदिया, यवतमाळ ४० अंशाच्या वर आहेत.

दिवसासह रात्रीचे तापमानही वाढले आहे. चंद्रपूरमध्ये २६.६ तर वर्ध्यात २६.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. नागपूरला रात्रीचा पारा २४.३ अंशावर गेला. अमरावती, ब्रम्हपुरी २५.६ अंश तर यवतमाळ २५.५ अंश नाेंदविण्यात आले. गाेंदिया व अमरावती वगळता रात्रीचे तापमान सर्वत्र सरासरीपेक्षा वर आहे. पारा वाढल्याने उष्णता व उकाड्यामुळे चिडचिड करणारे वातावरण जाणवत आहे. दरम्यान शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी ढगाळ व वीजगर्जना राहण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामान