लोकमत न्यूज नेटवर्कनागपर : सर्वात महागडा अमली पदार्थ म्हणून ओळखला जाणाऱ्या एमडी पावडरची तस्करी करणारा मोहित राजकुमार साहू (वय २४, रा. कोलबा स्वामीनगर) आणि आमिर मलिक मुकीम मलिक (वय २८, रा. हमिदनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७९ ग्राम एमडी पावडर आणि महागड्या मोबाईलसह ४ लाख, ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास दयानंद पार्कजवळ पाचपावली पोलिसांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.मोहित गेल्या अनेक वर्षांपासून अमली पदार्थाच्यातस्करीत गुंतला आहे. त्याला जुलै २०१७ मध्येही कोकेनसह अटक करण्यात आली होती. दरम्यान, मोहित आणि त्याचा एक साथीदार आज पहाटे एमडीची मोठी खेप घेऊन येणार असल्याची माहिती पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. ही माहिती पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांना कळविल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. पहाटे ३.३० च्या सुमारास आरोपी मोहित साहू अॅक्टिव्हाने दयानंद पार्कजवळून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला रोखत तपासणी केली असता त्याच्याकडे तब्बल ७९ ग्राम एमडी पावडर आणि ३५ हजार रुपये तसेच दोन आयफोन आढळले. पोलिसांनी हे सर्व आणि अॅक्टिव्हा जप्त केली. प्राथमिक चौकशीत मोहितने एमडीच्या तस्करीत आमिर मुकीमचा सहभाग असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आमिरलाही भल्या सकाळी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर, पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक ढाकूलकर, गजानन निशितकर, राज चौधरी, संजय गिते, विजय लांडे आणि सचिन सोनवणे यांनी ही कामगिरी बजावली.साथीदार फरारमोहित आणि आमिर यांच्यासोबत एमडीची तस्करी करणारांची भली मोठी टोळी आहे. गुन्हे शाखेतील एका पोलिसासोबत मोहितचे मधूर संबंध आहे. सेटर म्हणून तो पोलीस ओळखला जातो. त्या पोलिसाच्या सहकार्यानेच मोहित कोकेननंतर एमडीच्या तस्करीकडे वळल्याचे बोलले जाते. दरम्यान, मोहित पकडला गेल्याचे कळताच त्याचे अनेक साथीदार पळून गेले. पुढच्या काही तासात त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपुरात एमडी तस्कर मोहित साहूसह दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:45 IST
सर्वात महागडा अमली पदार्थ म्हणून ओळखला जाणाऱ्या एमडी पावडरची तस्करी करणारा मोहित राजकुमार साहू (वय २४, रा. कोलबा स्वामीनगर) आणि आमिर मलिक मुकीम मलिक (वय २८, रा. हमिदनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७९ ग्राम एमडी पावडर आणि महागड्या मोबाईलसह ४ लाख, ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास दयानंद पार्कजवळ पाचपावली पोलिसांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.
नागपुरात एमडी तस्कर मोहित साहूसह दोघे गजाआड
ठळक मुद्देपावडरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त : पाचपावली पोलिसांची कामगिरी