शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नागपुरात एमबीबीएस प्रवेशासाठी अडीच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:03 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) एमबीबीएस व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल झाली नसली तरी पीडितांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना भेटून आपबिती सांगितली.

ठळक मुद्देमेडिकलमधील घटना : व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे दाखविले आमिष

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) एमबीबीएस व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल झाली नसली तरी पीडितांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना भेटून आपबिती सांगितली.मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील एका उच्चशिक्षित कुटुंबातील मुलाला त्याच्याच गावातील ओळखीच्या महिलेने नागपूर मेडिकलमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात प्रवेश देण्याचे आमिष दाखविले. त्या महिलेने एका रहमान नावाच्या गृहस्थासोबत ओळख करून दिली. त्याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियातील नागपूर मेडिकलचे खोटे दस्तावेज दाखवून त्यांचा विश्वास जिंकला. मेडिकल प्रशासनाशी थेट संबंध असल्याने एमबीबीएसला प्रवेश देण्यास अडचण जाणार नाही, असा आत्मविश्वासही दाखविला. विशेष म्हणजे, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) देणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्याने अशी कुठलीही परीक्षा दिलेली नसताना त्याच्या कुटुंबीयांना मुलगा डॉक्टर होईल, असे स्वप्न दाखविण्यात आले. त्यांच्याकडून कधी २५ हजार तर कधी ३० हजार असे करून आतापर्यंत अडीच लाख उकळले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रवेशासंदर्भातील हालचाली बंद झाल्याने आणि समोरील व्यक्तीकडून प्रतिसाद मिळेनासा झाल्याने कुटुंबीयांचा संशय वाढला. शहानिशा करण्यासाठी शनिवारी थेट मेडिकल गाठले. येथे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना भेटून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. डॉ. निसवाडे यांनी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा ‘नीट’ देणे आवश्यक असून त्याशिवाय प्रवेश दिला जात नाही, तुमची फसवणूक झाल्याचे सांगून झालेल्या प्रकाराची तातडीने पोलिसांमध्ये तक्रार करण्याची सूचना केली; सोबतच प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती पारदर्शक असून ती संबंधित संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचेही त्यांना सांगितले. परंतु सायंकाळपर्यंत अजनी पोलीस ठाण्यात अशी कुठलीही तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती. गेल्या चार-पाच महिन्यांत मेयो, मेडिकलमध्ये अशा लुबाडणुकीच्या प्रकारात वाढ झाल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयCrimeगुन्हा