शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मटका अड्ड्यावर छापा, युवक जखमी, ११ सटोडे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:11 IST

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सट्टा अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घालून ११ जणांना पकडले. त्यांच्याकडून १४ हजार रुपये जप्त करण्यात आले. याच कारवाईदरम्यान एका पोलिसाने आपल्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याचे फोटो मोहम्मद वसिम ऊर्फ गोलू नामक तरुणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. तर, सट्टा अड्ड्यावर कारवाईसाठी धडकलेल्या पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वसिमने स्वत:च स्वत:ला जखमी करून घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सट्टा अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घालून ११ जणांना पकडले. त्यांच्याकडून १४ हजार रुपये जप्त करण्यात आले. याच कारवाईदरम्यान एका पोलिसाने आपल्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याचे फोटो मोहम्मद वसिम ऊर्फ गोलू नामक तरुणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. तर, सट्टा अड्ड्यावर कारवाईसाठी धडकलेल्या पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वसिमने स्वत:च स्वत:ला जखमी करून घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून एक मटका अड्डा सुरू होता. त्यावर सटोड्यांची नेहमी वर्दळ राहायची. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) त्या सट्टा अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घातला. तेथे सट्ट्याची खयवाडी-लगवाडी करणारे ११ सटोडे पोलिसांना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून १४ हजार रुपये आणि मोबाईल जप्त केले. कमल डोंगरवार, लक्ष्मण पराते, इम्रान खान, प्रतीक मसराम, राहुल कुटीकर, यश तिवारी हे सर्व सट्टा अड्ड्यावर मटक्याची खयवाडी करताना पोलिसांना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन एसएसबीचे पथक पोलीस ठाण्यात नेत होते. दरम्यान या अड्ड्याचा सूत्रधार वसिम असल्याचे कळाल्याने हवालदार मुकुंदा गारमोडे त्याच्याकडे धावले. ते पाहून वसिमने स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून जखमी केल्याचे पोलीस सांगतात. दुसरीकडे हवालदार मुकुंदा यांनी पैसे मागितले, दिले नाही म्हणून त्यांनी ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप वसिमने लावला होता. हवलदार मुकुंदा दारूच्या नशेत असल्याचाही आरोप मुकुंदाने लावला होता. जखमी अवस्थेतील फोटोही वसिमने व्हायरल केले होते. त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती.

 

 

टॅग्स :raidधाडArrestअटक