शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हुंड्यासाठी नवऱ्याने बायकोच्या आंघोळीची बनविली क्लिपिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:41 IST

आई-वडिलांचेदेखील प्रोत्साहन, गुन्हा दाखल

नागपूर : हुंड्यासाठी पती व सासरचे लोक कुठल्याही थराला जाताना दिसून येतात. मात्र वाशिम येथील एका पतीने हुंड्यासाठी माणुसकीच सोडली व स्वत:च्याच पत्नीची आंघोळ करत असताना क्लिपिंग बनवून तिला ब्लॅकमेल केले. यासंदर्भात मानकापूर पोलिस ठाण्यात पतीसह आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३५ वर्षीय महिलेचा पती आणि सासरे वाशिम येथे राहतात. महिलेचे पहिले लग्न २००८ मध्ये झाले होते. पती तिच्यावर अत्याचार करायचा. यादरम्यान तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यानंतरही अत्याचारामुळे तिने पतीपासून घटस्फोट घेतला. ती मुलांसोबत आई-वडिलांच्या घरी राहू लागली. यादरम्यान तिची व्यावसायिक तरुणाशी एका ऑनलाइन विवाह संकेतस्थळावर ओळख झाली. नोव्हेंबर २०१९ मध्ये तिने तरुणाशी लग्न केले. तिच्या नातेवाईकांनी हुंड्यात चार लाख रुपयांचे दागिने दिले. ती मुलांना आई-वडिलांकडे सोडून तरुणासोबत राहू लागली.

महिला गरोदर राहिल्यानंतर पती आणि तिच्या आई-वडिलांनी १० लाख रुपयांची मागणी करून तिचा छळ सुरू केला, त्यामुळे तिचा गर्भपात झाला. पुन्हा गरोदर राहिल्यानंतरही तिचा गर्भपात झाला. या छळाला कंटाळून महिला आई-वडिलांकडे गेली. पतीने तिची समजूत घातल्यानंतर तिला परत बोलावले व फ्लॅटमध्ये ठेवले. यानंतरच आंघोळ करताना मोबाईलवरून क्लिपिंग करण्यात आली. १० लाख रूपये न दिल्याने क्लिपिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. तिचे दागिनेही परत करण्यास नकार दिला. याप्रकरणी महिलेने मानकापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाdowryहुंडाhusband and wifeपती- जोडीदार