शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मॉल ग्राहकाविना तर फूटपाथवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 23:08 IST

अनलॉक-४ मध्ये ऑड-इव्हन सुरू झाल्यानंतर दुकाने खुली झाली आहेत. पण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होण्याऐवजी फूटपाथवरील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची जास्त गर्दी दिसून येत आहेत. याशिवाय मॉलमध्ये ग्राहकांचा अभाव आहे.

ठळक मुद्देनागरिकांना कोरोनाचे भय नाही : फूटपाथवरील गर्दीने प्रशासन चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉक-४ मध्ये ऑड-इव्हन सुरू झाल्यानंतर दुकाने खुली झाली आहेत. पण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होण्याऐवजी फूटपाथवरील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची जास्त गर्दी दिसून येत आहेत. याशिवाय मॉलमध्ये ग्राहकांचा अभाव आहे. त्यामुळे त्यांना खर्चही काढणे कठीण झाले आहे. खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला जात आहे. मॉल ग्राहकाविना तर फूटपाथवर गर्दी, असे बाजारात चित्र दिसून येत आहे.

इतवारी, गांधीबाग, महाल, सीताबर्डी बाजारात फूटपाथवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. नागरिकांमध्ये कोरोनाचे भय दिसून येत नाही. फूटपाथवरील गर्दीने प्रशासन चिंतेत असून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ही दुकाने बंद करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.व्यापाऱ्यांनी सांगितले की, मॉलमध्ये ग्राहक नसल्याने संचालक खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कमी करीत आहेत. शासनातर्फे शोरूम संचालकांना कोणतीही मदत मिळत नाही. शासनाने इंडस्ट्रीच्या विविध वर्गाला मदत देऊ केली आहे. शोरूम संचालक आता काम करण्याच्या स्थितीत नाहीत. आर्थिक संकटात त्यांना दिवस काढावे लागत आहे. याशिवाय शोरूमचे भाडे चुकते करणेही शक्य नसल्याने अनेकजण बंद करण्याच्या तयारीत आहेत. ग्राहक सध्या केवळ आवश्यक वस्तूंचीच खरेदी करीत आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी नंतरही करता येऊ शकते. यामुळे मोठ्या शोरुममध्ये ग्राहक येत नाहीत. केवळ रविवारी ग्राहक येतात, इतर दिवशी कुणीही येत नाहीत. बाजाराप्रमाणेच मॉलमध्येही आॅड-इव्हनमध्ये सूट दिलेली आहे. त्यामुळे शोरूम आणि दुकाने दररोज उघडत आहेत.नागपुरात जवळपास ८ ते १० मोठे शॉपिंग मॉल आहेत. यामध्ये रेडिमेड गारमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरूम जास्त आहेत. लॉकडाऊन लागले तेव्हा उन्हाळ्याचा सिझन सुरू झाला होता. तेव्हा कपड्यांचे ऑर्डर दिले होेते. पण शोरूम बंद झाल्याने कपडे विकले गेले नाहीत. उन्हाळ्याचा स्टॉक पडून आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचाही साठा आहे. कुलर आणि एसी विक्रीविना पडून आहेत. सर्व शोरूम वातानाकुलित आहेत. हे युनिट सुरू ठेवण्यासाठी विजेचे जास्त बिल येत असल्याने ते बंद केले आहेत.व्यापारी म्हणाले, ही स्थिती डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॉलमध्ये नवीन माल बोलविण्यावर संचालक तयार नाहीत. वीजबिल, कर्मचाऱ्यांचा खर्च काढणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहेत तर दुसरीकडे फूटपाथवर गर्दी वाढत आहे. हीच स्थिती राहिली तर काही दिवसात शहरातील मॉल बंद होतील.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर