शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणींना मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 23:17 IST

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शासन निर्देशांनुसार काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. आता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणीसह घरकामगारांना काम करण्यास महापालिकेतर्फे सूट देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शासन निर्देशांनुसार काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. आता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणीसह घरकामगारांना काम करण्यास महापालिकेतर्फे सूट देण्यात आली आहे. मात्र, शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरकामास जाणार नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात घरकामास जाऊ शकणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय घरकामगारांना कामावर बोलावणे अथवा न बोलावणे हा निर्णय पूर्णपणे संबंधित घरप्रमुख किंवा सोसायट्यांंवर सोपिवण्यात आला आहे. मात्र, याबातचा निर्णय घेताना दोघांनाही सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू झाल्यापासून शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करत बहुतांश सोसायटी आणि घराघरांमध्ये घरकामासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांनाही सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी तसेच सोसायट्यांनी स्वत:हून रजा दिली होती. दरम्यान लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत राज्य शासनाने वाढविला असला तरी स्थानिक प्रशासनाने काही बाबींसाठी शिथिलता आणली आहे. यामुळे दैनंदिन कामकाज हळुहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.दरम्यान, घरकाम करणारयाबाबत बऱ्याच नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक सोसायट्यांनी स्वत:हून घरकामगारांबाबत टाकलेले निर्बंध हटविले नाही. यासंदर्भात स्पष्टता आणताना मनपा आयुक्तांनी घरकामासाठी किंवा रुग्ण, वृद्ध यांचेसाठी केअरटेकर ठेवण्याबाबत मनपा प्रशासनाने निर्बंध लावण्याबाबत कोणतेही आदेश काढलेले नाही,असे स्पष्ट केले.घरकामगारांनी घ्यावी काळजीखबरदारीचा उपाय म्हणून घरकामगारांनी कामावर येताना हात स्वच्छ धुणे, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे या गोष्टी पाळणे गरजेचे आहे.वृद्ध रुग्णांच्या केअरटेकर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर निर्बंध नाहीवृद्ध आणि रुग्णांच्या सुविधेच्या दृष्टीने त्यांच्या केअरटेकरसाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सेवा देण्यास कुठलेही निर्बंध नसल्याची माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी दिली. मोठ्या सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती राहतात. त्यांना जीवन जगणे सुकर व्हावे व दैनंदिन जीवनात अडचण निर्माण होउ नये यासाठीही सोसायट्यांनी घरकाम करणा-या व्यक्तींना खबरदारीचे सर्व नियम पाळून सोसायटीमध्ये प्रवेश देण्यास हरकत नाही, असेही मुंढे यांनी सांगितले.

टॅग्स :WomenमहिलाEmployeeकर्मचारी