शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागपूर महामॅरेथॉन : नागराज खुरसणे, प्राजक्ता गोडबोले विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 20:22 IST

‘अभिजित रियल्टर्स अ‍ॅन्ड इन्फ्राव्हेंचर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ च्या ’ला राज्य तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देहजारो स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘धावणे हीच उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली’चा दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेले काही महिने ज्याची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती, त्या ‘अभिजित रियल्टर्स अ‍ॅन्ड इन्फ्राव्हेंचर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ च्या ’ला राज्य तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मॅरेथॉनमुळे जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या संत्रानगरीत गर्दीसह शिस्तबद्धतेचा, तसेच भव्यतेचा एक नवा मानदंड प्रस्थापित झाला. स्पर्धेतील आबालवृद्धांचा सहभाग, धावपटूंना प्रोत्साहन देण्याकरिता उसळलेली गर्दी, आतषबाजी, फुलांची उधळण, स्पर्धेच्या मार्गावर विविध वाद्यांनी धावपटूंचे झालेले स्वागत अशा जल्लोषपूर्ण वातावरणात या महामॅरेथॉनची रंगत वाढली. ‘धावणे हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’ हा संदेश देत समाजमनात एकतेचा व बंधुभावाचा धागा गुंफला. रविवारी कस्तुरचंद पार्कवरुन प्रारंभ झालेली २१ किमी खुल्या गटातील  महामॅरेथॉन नागपूरचा नागराज खुरसणे व नागपूरचीच प्राजक्ता गोडबोले यांनी जिंकली.रविवारी पहाटे वॉर्मअपनंतर धावण्यास सिद्ध झालेल्या २१ किमी खुल्या गटातील धावपटूंना सकाळी सव्वासहा वाजता आमदार अनिल सोले, आमदार परिणय फुके, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अभिजित रिएलेटर्स अ‍ॅन्ड इन्फ्राव्हेंचर्सचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित मजुमदार व श्रीमती इनू मजुमदार, कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्सचे एमडी वीरेंद्र कुकरेजा, एलेक्सिस हॉस्पिटलचे डायरेक्टर ( ऑपरेशन) सूरज त्रिपाठी, बालन ग्रुपचे डायरेक्टर पूनित बालन, एचडीएफसीचे डीजीएम (बिझिनेस) नीतिन झवर, माजी महापौर विकास ठाकरे, सेन्ट पॉल स्कूलचे डायरेक्टर राजाभाऊ टाकसाळे, फ्रुटेक्सचे संजय झवर, आरएमडी फुड््स अँड ब्रेवरेजेसच्या संचालक जानव्ही धारीवाल, कुसुमताई बोधड लोकसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आरती बोदड, मॉयलचे सीनिअर उपमहाव्यवस्थापक (पर्सनल) त्रिलोकचंद दास, ट्रिट आईस्क्रीमचे संचालक अमोल चकनलवार, संदीप युनिव्हसिटीचे प्रा. हेमंत करकडे, नागपूरचे बीडीएम राहुल हजारे, लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापक रुचिरा दर्डा व रेस डायरेक्टर (महामॅरेथॉन) संजय पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ झाला. यानंतर प्रत्येक पंधरा मिनिटांच्या अंतराने विविध गटांतील स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ‘फ्लॅग ऑफ’ करून सोडण्यात आले.यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला वरील मान्यवरांसह खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री अनिस अहमद, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नागपूर महामेट्रोचे सीएमडी ब्रजेश दीक्षित, शहर काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा, शारदा क्लासेसचे संचालक नारायण शर्मा, दिलीप पनकुले, अनिल अहिरकर यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनीही आयोजनस्थळी भेट दिली.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन