शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या कळमना भागात विद्यार्थिनीला भरधाव ट्रेलरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:55 IST

शाळेत निघालेल्या एका सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव ट्रकट्रेलरने चिरडले. कळमना परिसरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्दे संतप्त जमाव, तणाव

आॅनलाईन लोकमतनागपूर : शाळेत निघालेल्या एका सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव ट्रकट्रेलरने चिरडले. कळमना परिसरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भारती अरुण वनवासे (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती चिखली कळमन्यातील म्हाडा कॉलनीत राहात होती.भारतनगरातील राम मनोहर लोहिया शाळेची दहावीची विद्यार्थिनी असलेली भारती नेहमीप्रमाणे शाळेत जायला सोमवारी सायकलने निघाली. सकाळी ११.३० च्या सुमारास ती गोमती शाळेजवळून जात होती. सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने हा मार्ग एकतर्फी करण्यात आला आहे. जागोजागी मातीचे ढिगारेही आहेत. रस्त्याच्या काठाने मार्ग काढत जात असलेल्या भारतीची सायकल घसरल्याने ती खाली पडली. त्याचवेळी भरधाव आलेल्या ट्रेलर क्रमांक एमएच ४०/ एन २५४७ च्या चालकाने तिला चिरडले. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. संतप्त नागरिकांनी रस्त्याचे बांधकाम करणाºया कंत्राटदार तसेच महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करून घोषणाबाजी केली. तणाव निर्माण होत असतानाच कळमना पोलीस पोहोचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. भारतीचा मृतदेह रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर आरोपी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.जागोजागी मातीचे ढिगारे पडून असल्याने नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी या भागातील लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाकडे केल्या, मात्र त्या दुर्लक्षित करण्यात आल्या. भारतीचा जीव गेल्यानंतर काही वेळेतच बधिर प्रशासनाला जाग आली. लगेच मातीचे ढिगारे साफ करून रस्ता व्यवस्थित करण्याचे काम सुरू झाले. हेच काम आधी झाले असते तर भारतीचा जीव वाचला असता.

 

 

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर