शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

लष्करप्रमुख विपीन रावत ५ जानेवारीला नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:52 IST

भोसला मिलिटरी शाळा नागपूरचा २३ वा वार्षिक उत्सव ५ जानेवारीला सायंकाळी ३.५५ वाजता कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. वार्षिक परेडला लष्करप्रमुख विपीन रावत मुख्य अतिथी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती सेंट्रल हिंदू मिलिटरी शिक्षण सोसायटी, नाशिकचे (सीएचएमईएस) अध्यक्ष सूर्यरतन डागा यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देभोसला मिलिटरी शाळेचा वार्षिक उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भोसला मिलिटरी शाळा नागपूरचा २३ वा वार्षिक उत्सव ५ जानेवारीला सायंकाळी ३.५५ वाजता कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. वार्षिक परेडला लष्करप्रमुख विपीन रावत मुख्य अतिथी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती सेंट्रल हिंदू मिलिटरी शिक्षण सोसायटी, नाशिकचे (सीएचएमईएस) अध्यक्ष सूर्यरतन डागा यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी सोसायटीचे सचिव कुमार काळे आणि भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर उपस्थित होते.डागा म्हणाले, वार्षिक उत्सवात पूर्ण सैनिकी वेशभूषेत औपचारिक परेड हा मुख्य कार्यक्रम आहे. पीटी डिस्प्ले, घोडेस्वार शो, टेंट पेगिग, एरोबेटिक्स (कवायत) व एरो मॉडेलिंग शोचा समावेश आहे. कार्यक्रमाचा शेवट हा शाळेतील पाईप व ड्रम बॅण्डने केलेल्या ‘बिटिंग व रिट्रीज’ने होणार आहे. १५ नोव्हेंबर १९९९ पासून आयोजित वार्षिक उत्सवात भारतीय सशस्त्र दलामध्ये सेवाव्रत अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येते. यापूर्वी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, अ‍ॅडमिरल आर.के. रावत, एअर मार्शल अजित एस. भोसले, एअर मार्शल एस.बी. देव उपस्थित होते. वार्षिक उत्सवात भोसला मिलिटरी शाळेचे ८५० विद्यार्थी, अन्य शाळांचे दोन हजार विद्यार्थी आणि पालक हजर राहणार आहेत.डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी १९३५ मध्ये सेंट्रल हिंदू मिलिटरी शिक्षण सोसायटीची स्थापना नाशिक येथे केली. मुलांना सैनिकी शिक्षण मिळावे म्हणून सन १९३७ मध्ये भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे सुरू केली. नागपूर येथे भोसला मिलिटरी शाळेची सुरुवात जून १९९६ मध्ये ४० विद्यार्थ्यांसह सुरू करण्यात आली. १५ नोव्हेंबर १९९९ मध्ये ३० एकरातील हिरव्यागार परिसरात स्थापना करण्यात आली.शाळेमध्ये संपूर्ण भारतातील ८५९ विद्यार्थी आहेत. त्यातील ३२९ विद्यार्थी महाराष्ट्र जनजातीय कल्याण विभाग अधीन विदर्भ अध्ययनच्या नक्षल प्रभावित क्षेत्राशी संबंधित आहेत. दोन दशकांच्या प्रवासात मध्यभारताच्या प्रमुख आवासीय संस्थेत स्थानांतरित केले आहे. व्यापक स्वरुपात सैनिकी शिक्षणाचे केंद्र म्हणून मान्यताप्राप्त आहे. शाळेत अभ्यासक्रमासह साहसिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. शाळेय खेळांमध्ये रेकॉर्ड आहेत. जलतरण, बॉक्सिंग, तलवारबाजी व नेमबाजीमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्थान बनविले आहे. शाळेतील पाईप बॅण्डची मध्य भारतातील सर्व शाळांमध्ये प्रशंसा झाली आहे. कार्यक्रमात स्थानिक नागरिक आणि सैन्यातील गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतnagpurनागपूर