शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रेयसीसोबत सलगी साधणाऱ्या मित्राला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:34 IST

आपल्या प्रेयसीवर डोळा ठेवून तिच्याशी सलगी साधत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर त्याच्या दोन मित्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. नंदनवनमधील हिवरीनगरात सोमवारी रात्री ८.४५ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देनंदनवनमध्ये गुन्हा : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या प्रेयसीवर डोळा ठेवून तिच्याशी सलगी साधत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर त्याच्या दोन मित्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. नंदनवनमधील हिवरीनगरात सोमवारी रात्री ८.४५ च्या सुमारास ही घटना घडली. जखमी तरुणाचे नाव सूरज किशोर खानोरकर (वय २७) असून, तो त्रिमूर्तीनगरात राहतो.सूरज नंदनवनमध्ये एका दुकानात काम करतो. आरोपी निशांत भाकरे आणि कमलेश अलोणे (दोघेही रा. पारडी राममंदिराजवळ) हे त्याचे मित्रच आहेत. निशांतचे एका तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध आहे. काही दिवसांपासून सूरजने तिच्याशी सलगी साधण्याचे प्रयत्न चालवले. तिला फोन, मेसेज करण्याचा प्रकार सुरू केल्याचे निशांतच्या लक्षात आले. त्यामुळे सूरजला त्याने जाब विचारला. त्याने नकार दिल्याने काही दिवसांपूर्वी या संबंधाने प्रेयसी, निशांत, कमलेश आणि सूरजची बैठक झाली. त्यात सूरजने यापुढे आपण ‘तिला’ फोन मेसेज करणार नाही, असे सांगितले. मात्र, त्याने फोन आणि मेसेज करण्याचा प्रकार सुरूच ठेवल्याचा संशय आल्याने आरोपी निशांत भाकरे आणि कमलेशने सूरजला धडा शिकविण्याचा कट रचला.सोमवारी रात्री दुकान बंद करून सूरज नंदनवनमधून आपल्या घराकडे निघाला होता. आरोपी निशांत आणि कमलेश यांनी दुचाकीवर (एमएच ४९/ डब्ल्यू ३७३०) येऊन हिवरीनगरातील शिवाजी सोसायटीत सूरजला थांबवले. ‘तुझे प्रणाली सोबत काय प्रकरण सुरू आहे’, अशी विचारणा केली. सूरजने आपले काहीही संबंध नाही, असे सांगितले. मात्र, आरोपींचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी सूरजसोबत वाद घातला. त्यानंतर आरोपी निशांतने त्याच्या खिशातून मिरची पूड बाहेर काढून ती सूरजच्या तोंडावर फेकली तर आरोपी कमलेशने चाकूने पोटावर, छातीवर वार करून सूरजला गंभीर जखमी केले. आरडओरड केल्याने सूरजच्या मदतीला बाजूची मंडळी धावली. ते पाहून आरोपी पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या सूरजला डॉक्टरकडे नेण्यात आले. उपचारानंतर त्याने नंदनवन पोलिसांना दिलेल्या बयानवजा तक्रारीवरून नंदनवनचे सहायक उपनिरीक्षक सलिम बेग यांनी आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला.आरोपी गजाआडपोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी धावपळ सुरू केली आणि दोघांनाही अटक केली. सूरजने मैत्रीत दगाबाजी केल्याने त्याला आपण धडा शिकविल्याचे आरोपी सांगत आहेत. पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा