शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अमित शहांऐवजी राजनाथसिंह येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:12 IST

भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येणार नसून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

ठळक मुद्देअनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनात निवडणुकीच्या तयारीवर मंथन : रविवारी जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येणार नसून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित राहतील. सभेच्या अगोदर सर्व चार हजार प्रतिनिधी दीक्षाभूमीला भेट देतील व त्यानंतर रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातदेखील जातील.दरम्यान अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे सरचिटणीस राम माधव व भूपेंद्र यादव यांनी प्रतिनिधींना २०१९ च्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले. कॉंग्रेस आरक्षणाबाबात संभ्रम निर्माण करत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या योजनांचा सर्वात जास्त लाभ अनुसूचित जातीलाच झाला आहे. केंद्र शासनांच्या योजनांचा बूथपातळीवर प्रचार-प्रसार करण्याची सूचना त्यांनी दिली. रविवारी अधिवेशनात मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा