शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नागपुरात  पत्नीच्या पुढाकारामुळे पतीचे अवयवदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:20 PM

‘ब्रेनस्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेनडेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देदोन्ही मूत्रपिंड, यकृत व बुबुळाचे दान : तिघांना मिळाले जीवनदान तर दोघांना दृष्टी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘ब्रेनस्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेनडेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यात पतीच्या बहिणीने व त्यांच्या कुटुंबीयानीही साथ दिली. यामुळे तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.बाबुराव तुंगापिंडी (४२) रा. आयुध फॅक्टरी, चांदा, भद्रावती, चंद्रपूर असे अवयवदात्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, बाबुराव तुंगापिंडी यांना ५ फेब्रुवारी रोजी तीव्र ‘ब्रेनस्ट्रोक’ आला. त्यांना तातडीने एका खासगी इस्पितळात दाखल केले. तो पर्यंत ते कोमात गेले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. ७ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मेंदू मृत (ब्रेनडेड) झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. तुंगापिंडी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. हॉस्पिटलचे डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांनी अवयवदानाचा सल्ला दिला. त्यांच्या पत्नी शबाना तुंगापिंडी, त्यांची बहीण विज्रा सलीम सय्यद व कुटुंबातील सदस्य संजय आनंद यांनी त्या दु:खातही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, उपाध्यक्ष व्ही. एल. गुप्ता व सचिव डॉ. संजय कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात ‘झेडटीसीसी’च्या समन्वयिका वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. दोन्ही मूत्रपिंड, यकृत व दोन्ही बुबुळाचे दान करण्यात आले.वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ४६ वर्षीय महिलेवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. सुजीत हाजरा, डॉ. अवंतिका जयस्वाल यांनी केली. त्यांना हॉस्पिटलचे प्रमुख के. सुजाता यांचे मार्गदर्शन मिळाले. दुसरे मूत्रपिंड ५६ वर्षीय महिलेला, तर यकृत ६३ वर्षीय पुरुषाला देण्यात आले. दोन्ही बुबुळ माधव नेत्रपेढीला दान करण्यात आले.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर