शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे उद्योगपुरुष हरगोविंद बजाज यांचे निधन; उद्योग, व्यवसाय जगतात शोककळा

By जितेंद्र ढवळे | Updated: October 14, 2023 05:49 IST

हरगोविंद बजाज यांचे नागपूरसह विदर्भात औद्योगिकीकरणाला चालना देण्यात महत्त्वाचे योगदान आहे...

नागपूर : उद्योगपुरुष आणि बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक हरगोविंद गंगाबिसन बजाज यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गायत्रीदेवी बजाज,  मुलगा रोहित व सुनील बजाज, तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘साकेत,’ ५५, फार्मलॅण्ड, रामदासपेठ येथून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. तिथे त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येतील. हरगोविंद बजाज यांचे नागपूरसह विदर्भात औद्योगिकीकरणाला चालना देण्यात महत्त्वाचे योगदान आहे. विदर्भात उद्योगांच्या स्थापनेचे स्वप्न त्यांनी बघितले व विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष असताना ते कार्य पूर्ण करण्यास  सामर्थ्य पणाला लावले. ते एक कुशल व्यावसायिक होते. त्यांनी विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्न केले. ते प्रमुख राष्ट्रीय प्लास्टिक संघटनेत सक्रिय होते. त्यांचे प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाचे योगदान राहिले आहे. 

स्टील चेंबरचे संस्थापक सदस्य असलेल्या बजाज यांनी आपल्या नैतिक मूल्यांवर विशेष लक्ष दिले होते. ते हुंडाविरोधी होते. मुलांचे लग्न साध्या पद्धतीने करीत उपस्थित सर्वांना त्यांनी केवळ आशीर्वाद देण्याची विनंती केली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी त्यांची भेट घेतली होती. याप्रसंगी त्यांना बोलणे कठीण जात होते. तरीही त्यांचे हावभाव डॉ. दर्डा यांना समजत होते. त्यांच्या निधनावर  डॉ. विजय दर्डा यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. त्याचबरोबर विविध औद्योगिक व व्यावसायिक संघटनांनी उद्योगपुरुष हरगोविंद बजाज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यूbusinessव्यवसाय