शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्याची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:55 IST

कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीने शहरात हैदोस घातला आहे. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यासह चार जणांच्या कारमधून त्यांनी रोख आणि मौल्यवान चीजवस्तू असलेल्या बॅग लंपास केल्या. बुधवारी दुपारी २ ते ७ या पाच तासांच्या कालावधीत या घटना घडल्या. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअण्णा टोळीचा हैदोस : पाच तासांत चौघांच्या बॅग कारमधून लंपास : सीताबर्डी, बजाजनगर, अंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीने शहरात हैदोस घातला आहे. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यासह चार जणांच्या कारमधून त्यांनी रोख आणि मौल्यवान चीजवस्तू असलेल्या बॅग लंपास केल्या. बुधवारी दुपारी २ ते ७ या पाच तासांच्या कालावधीत या घटना घडल्या. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.न्यू नंदनवनमधील कीर्ती नगरात राहणारे आवेश आनंद तितरमारे (वय ३०) हे प्राप्तीकर खात्यात सहायक आयुक्त आहेत. बैठकीच्या निमित्ताने बुधवारी रात्री ७ वाजता रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये ते आले होते. त्यांनी आपली बॅग समोरच्या सीटवर ठेवून चालकाला कार पार्किंगमध्ये लावण्याची सूचना केली आणि ते हॉटेलमध्ये निघून गेले. काही वेळेनंतर त्यांना कारचालकाचा फोन आला. चोरट्यांनी कारमधील बॅग लंपास केल्याचे त्याने तितरमारे यांना सांगितले. तितरमारे यांच्या बॅगमध्ये लॅपटॉप, हार्डडिस्क आणि रोख ११ हजार रुपये होते. त्यांनी सीताबर्डी पोलिसांना ही माहिती कळवली. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्याची बॅग चोरीला गेल्याचे कळाल्याने पोलिसांतही खळबळ निर्माण झाली.अशी घडली घटनातितरमारे यांच्या कारचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे म्हणून कारचालकाचे लक्ष विचलित केले. कारचालकाने खाली उतरून बघितले असता कारच्या मागच्या बाजूला १०, २० च्या नोटा पडून दिसल्या. त्या तो उचलत असताना चोरट्यांनी डाव साधला आणि तितरमारे यांची बॅग लंपास केली. सीताबर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.घटनास्थळापासून १०० फुट अंतरावर दुपारी २ च्या सुमारास अशीच एक घटना घडली होती. डेंझिल रॉबिन फ्रान्सिस (वय ३२, बेलीश्याम रेल्वे कॉलोनी, पाचपावली) हे त्यांच्या कारमालकाला मिटिंगमध्ये सोडण्यासाठी रामदासपेठेत आले होते. त्यानंतर चालक अंजनी हॉस्पिटलच्या बाजूला कारमध्ये मोबाईलवर गेम खेळत बसला. दोन आरोपी त्याच्याजवळ आले. त्यांनी कारच्या खाली पैसे पडून आहेत, असे म्हणून कारचालकाला दार उघडण्यास भाग पाडले. चालक १०-२०च्या नोटा उचलत असताना आरोपीने कारमालकाची लॅपटॉप असलेली बॅग लंपास केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी