शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
2
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
3
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
4
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
5
"बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन…" IPL वर वसीम अक्रमची तिखट टिप्पणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
7
‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
8
प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक
9
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
10
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
11
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
12
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
13
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
14
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
15
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
16
Nagpur: तुला नोकरी मिळवून देतो, आधी माझ्याशी...; विश्वास टाकून फसली अन् महिला कबड्डीपटूला आयुष्याला मुकली
17
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
18
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
20
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: तुला नोकरी मिळवून देतो, आधी माझ्याशी...; विश्वास टाकून फसली अन् महिला कबड्डीपटूला आयुष्याला मुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:54 IST

नागपूर जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू असलेल्या तरुणीने आत्महत्या केली. एका तरुणाने तिला नोकरी लावून देतो, पण आधी लग्न करावे लागेल म्हणत जाळ्यात अडकवले.

Nagpur Crime news: आर्थिक परिस्थिती हलाखीची, शिक्षण घेऊनही हाताला काम नाही, त्यातच तरुणाने तिला नोकरी मिळवून देण्यासाठी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नोकरी मिळेल या आशेपोटी महिला कबड्डीपटूने त्याच्याशी लग्न तर केले, मात्र काही दिवसांनी आपण लग्न करून फसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यातच त्याचा मानसिक त्रासही वाढला. हा मनस्ताप असह्य झाल्याने अखेर तिने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे रविवारी (७ डिसेंबर) ही घटना घडली.

किरण सूरज दाढे (वय २९, रा. माळेगाव टाऊन, ता. सावनेर) असे मृत महिला कबड्डीपटूचे नाव आहे. स्वप्निल जयदेव लांबघरे (३०, रा. पटकाखेडी, ता. सावनेर) असे फरार आरोपीचे नाव आहे. 

नोकरीसाठी प्रयत्न केले, यश आले नाही 

किरणने सावनेर शहरातील डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालयात बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेत तिने विद्यापीठाच्या संघातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजविले. उत्कृष्ट कबड्डीपटू असल्याने आपल्याला नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असल्याने तिने सैन्य दलासोबत पोलिस, होमगार्ड, डिफेन्ससह अन्य विभागांत नोकरीसाठी सतत प्रयत्न केले. 

रुग्णालयात काम करू लागली

नोकरी मिळण्यात यश येत नसल्याने तसेच घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने सावनेरातील डॉ. अनुज जैन यांच्या डेंटल - क्लिनिकमध्ये, तर तिच्या धाकट्या भावाने मोबाइल शॉपीमध्ये कामाला सुरुवात केली.

स्वप्निलने किरणच्या परिस्थितीचा घेतला फायदा 

याच काळात तिची स्वप्निलसोबत ओळख झाली. त्याने तिच्या अगतिकतेचा फायदा घेत त्याची शेती वेकोलिने अधिग्रहित केल्याने त्या शेतीच्या आधारे तिला व तिच्या भावाला वेकोलित नोकरी लावून देण्याची बतावणी केली.

त्यासाठी आपल्यात नातेसंबंध असणे आवश्यक असल्याचे सांगून त्याने तिला लग्न करण्याचा प्रस्ताव तिला दिला.  तिने त्याच्यावर विश्वास ठेवत १० जुलै २०२० रोजी त्याच्याशी नोंदणी पद्धतीने लग्न केले. काही दिवसांनी तिच्या कुटुंबीयांना या लग्नाबाबत कळले. मात्र, ती लग्नानंतरही माहेरीच राहायची. 

सगळे मेसेज सेव्ह केले अन्...

पुढे त्याचा त्रास वाढल्याने तिने त्याचे मोबाइलमधील सर्व मॅसेज जतन करून ठेवत गुरुवारी (४ डिसेंबर) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेले. 

प्रथमोपचार केल्यानंतर तिला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर करीत आहेत.

संबंध ठेवण्यासाठी दबाव

लग्नानंतर स्वप्निल तिला व तिच्या भावाला नोकरी लावून देण्यासाठी टाळाटाळ करू लागला. सोबतच संबंध ठेवण्यासाठी तो दबाव आणत होता. 

संबंधासाठी आई-वडिलांना नकार दिल्यास घटस्फोट देण्याची धमकीही त्याने तिला दिली होती. तिला अडवून त्रास देणे, फोनवर शिवीगाळ करणे असे प्रकार त्याने सुरू केल्याने तिने घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. तरीही त्याचे तिला त्रास देणे सुरूच होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Job promise turns deadly; Kabaddi player dies by suicide.

Web Summary : A Nagpur Kabaddi player, promised a job through marriage, died by suicide after facing harassment and unfulfilled promises from her husband. He pressured her for intimacy and threatened divorce. A case has been registered, and the accused is absconding.
टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ